शेडगेवाडीतील गाव विहिरीत मृतदेह आढळला
मृत्यूचे कारण अस्पष्ट; दूषित पाण्यामुळे गावात टँकरद्वारे पुरवठा
मल्हारपेठ, ता. ६ ः शेडगेवाडी (ता. पाटण) गावातील विहिरीत गावातील एकाचा मृतदेह आढळून आला. संबंधित मृतदेह दोन ते तीन दिवस विहिरीतील पाण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. येथील पोलिसांनी संबंधित मृतदेह आज विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. दत्तात्रय कृष्णा थोरात (वय ३५, रा. शेडगेवाडी, ता. पाटण) असे मृतदेह आढळलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत नितीन राजाराम यादव (रा. शेडगेवाडी) यांनी पोलिसांत माहिती दिली. त्यानुसार दत्तात्रय थोरात हे ५ ऑक्टोबरला दुपारी साडेबारा वाजण्यापूर्वी शेडगेवाडी येथील गावातील विहिरीत पाण्यात पडून मृत झाल्याची नोंद केली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मृतदेह विहिरीत दोन ते तीन दिवस राहिल्याने विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून विहिरीतील दूषित पाण्याचा उपसा करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार विहिरीतील पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, विहिरीतील पाणी वापरता येत नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, यासाठी गावात टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली आहे. पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ग्रामस्थांनी दूषित पाण्याचा वापर करू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. हवालदार सचिन पाटील तपास करत आहेत. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
....................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.