पुणे

नव्याने झालेल्या शेळगाव आर गटावर कोणाचे वर्चस्व राहणार याकडे तालुक्याचे लक्ष

CD

लोगो : शेळगाव जि.प. गट
---
VRG26B06153
सोनाली बोधले
---
VRG26B06154
तनुजा अडसूळ ( केशरी रंग साडी)
---
सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे उमेदवारांची चुरस
राऊत-सोपल गटांची प्रतिष्ठेची लढत; वैराग न.पं.नंतर नव्या रचनेत गटाची निर्मिती
बलभीम लोखंडे : सकाळ वृत्तसेवा
वैराग, ता. २५ : बार्शी तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नव्याने अस्तित्वात आलेल्या शेळगाव जिल्हा परिषद गटात पहिल्यांदाच नवीन रचनेनुसार निवडणूक होत आहे. यापूर्वी वैराग जिल्हा परिषद गट अस्तित्वात होता; मात्र १८ मे २०२१ रोजी वैराग नगरपंचायतीची निर्मिती झाल्यानंतर शेळगाव गटाची नव्याने रचना करण्यात आली. या गटात एकूण २१ गावांचा समावेश आहे.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या गटात पंचायत समितीचे माजी सभापती अनिल डिसले, राज्य मार्केटिंग फेडरेशनचे अरुण कापसे, तसेच बाजार समितीचे संचालक बाबा गायकवाड यांचा मतदारसंघ समाविष्ट आहे. बार्शी तालुक्याचे राजकारण आजवर प्रामुख्याने माजी आमदार राजेंद्र राऊत व आमदार दिलीप सोपल यांच्या व्यक्तिकेंद्रित नेतृत्वाभोवती फिरत आले आहे.
राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आमदार नसतानाही राजेंद्र राऊत यांनी बार्शी बाजार समिती व नगरपालिका पुन्हा जिंकून आपले वर्चस्व कायम राखले आहे. दुसरीकडे, आमदार दिलीप सोपल हे तालुक्यातील अनुभवी व जनाधार असलेले नेतृत्व मानले जाते. सत्ताकेंद्र नसतानाही त्यांनी जनतेच्या पाठबळावर आमदारकी मिळवली असून, विविध पक्षांतून निवडून येत त्यांनी आपला गट मजबूत ठेवला आहे. अलीकडील नगरपालिका निवडणुकीत यश न मिळाले तरी त्यांना लक्षणीय जनमत लाभले आहे.
शेळगाव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने अनेक पुरुष इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. या गटात भाजपकडून (राऊत गट) सोनाली महेश बोधले, ऋतुजा राजेंद्र देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (सोपल गट) तनुजा विजय अडसूळ, सुषमा तुषार पाटील तर शीतल पांडुरंग पाटील, माधुरी प्रशांत देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
मानेगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून (सोपल गट) प्रांजली शहाजी पाटील, ऊर्मिला सुनील काशीद, भाजपकडून (राऊत गट) जयमाला भाऊसाहेब जाधव, स्मिता विशाल जाधव, वंचित बहुजन आघाडीकडून जयश्री व्यंकटराव देशमुख तर माधुरी प्रशांत देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
शेळगाव आर गणातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी सभापती कविता विनोद वाघमारे, संतोषी किशोर धेंडे, भाजपकडून सविता विश्वनाथ साबळे, अश्विनी दीपक साबळे, शिल्पा मसा साबळे तर अपक्ष म्हणून रेश्मा सुनील गायकवाड यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
नव्या गट रचनेत पहिल्यांदाच होणाऱ्या या निवडणुकीमुळे शेळगाव जिल्हा परिषद गटात हाय व्होल्टेज राजकीय लढतीची शक्यता वर्तवली जात आहे.
---
शेळगाव आर गटात येणारी गावे
- शेळगाव आर गण : शेळगाव आर, धामणगाव, राळेरास, सर्जापूर, हत्तीज, ज्योतिबाची वाडी, अंबाबाईची वाडी, सारोळे, भांडेगाव, आंबेगाव, कासारी.
- मानेगाव गण : मानेगाव, घाणेगाव, लाडोळे, नांदणी, हळदुगे, रातंजन, मुंगशी आर, मालेगाव, पिंपरी पा., हिंगणी पा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT