पुणे

शेंद्रे येथे एकाचा खून

CD

शेंद्र्यात एकाचा खून

जुन्‍या वादाचे कारण; दोघे ताब्‍यात

काशीळ, ता. ३ : शेंद्रे (ता. सातारा) येथे आज सायंकाळी जुन्‍या वादाच्‍या कारणावरून झालेल्‍या भांडणावेळी लोखंडी खोरे डोक्‍यात मारून सौरभ बाळू भिसे (वय २९, रा. शेंद्रे) यांचा खून करण्‍यात आला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी गावातीलच प्रमोद किसन जाधव, प्रताप किसन जाधव (मूळ रा. तारळे, ता. पाटण) यांना ताब्‍यात घेतले आहे.
शेंद्रे येथे सौरभ भिसे हे कुटुंबीयांसमवेत राहण्‍यास होते. गावात प्रमोद जाधव याचे टपरीवजा दुकान आहे. या दुकानात सौरभ भिसे यांचे वारंवार येणे-जाणे असे. गावातीलच असल्‍याने त्‍यांची एकमेकांशी चांगली ओळख होती. गणेशोत्‍सवात सौरभ भिसे आणि प्रमोद जाधव यांच्यात व्‍यवहाराच्‍या कारणावरून वाद झाला होता. हा वाद गावातीलच काही जणांनी मध्‍यस्‍थी करत मिटवला होता. या वादाच्‍या मुळाशी बेकायदेशीर दारूविक्रीची माहिती सौरभ भिसे हे पोलिसांना देत असल्‍याचे कारण असल्‍याची चर्चा ग्रामस्‍थांत आहे.
आज सायंकाळी सौरभ भिसे हे गावातील जाधव यांच्‍या टपरीवजा दुकानाजवळ आले होते. सौरभ भिसे आणि जाधव यांच्‍यात पुन्‍हा एकदा वाद उफाळून आला. हमरीतुमरी, धक्काबुक्कीसह एकमेकांच्‍या अंगावर धावून जाण्‍याचे प्रकार याठिकाणी सुरू होते. वाद वाढत जाऊन नंतरच्‍या काळात त्‍यांच्‍यात मारामारी सुरू झाली. याचदरम्‍यान प्रमोद जाधवने लोखंडी खोऱ्याने सौरभ भिसेच्‍या डोक्‍यात पाठीमागून जोराने प्रहार केला. ठोका जिव्‍हारी लागल्‍याने सौरभ भिसे हा रक्‍ताच्‍या थारोळ्यात निपचित पडले व त्‍यातच त्‍यांचा मृत्‍यू झाला. याची माहिती मिळाल्‍यानंतर उपअधीक्षक विपुल पाटील यांच्‍यासह सातारा तालुका पोलिस ठाण्‍याचे निरीक्षक नीलेश तांबेसह इतर अधिकारी, कर्मचारी त्‍याठिकाणी दाखल झाले. त्‍यांनी मृतदेहाचा पंचनामा करत तो रात्री शवविच्‍छेदनासाठी जिल्‍हा शासकीय रुग्‍णालयात पाठवून दिला. पोलिसांनी घटनास्‍थळावरून प्रमोद जाधव, प्रताप जाधव यांना ताब्‍यात घेतले आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्‍हा नोंदवण्‍याची प्रक्रिया सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

SCROLL FOR NEXT