शिक्रापूर, ता. २६ : बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित कै. मनीषाताई भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धेत ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. चार विविध गटांत झालेल्या या स्पर्धेत दिविशा गुगळे, वैष्णवी सरगर, निधी साळुंखे आणि भूमी सूर्यवंशी यांनी आपापल्या गटात यश मिळवले.
बालकलाकारांच्या अभिनयाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. शिक्रापूर येथे उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त डॉ. श्रीधर तानाजी धुमाळ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या वेळी अनुश्री धुमाळ, देवीप्रसाद सोहोनी उपस्थित होते. माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्षा दिपाली शेळके यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेचे परीक्षण अरुण पटवर्धन, मनोज डाळिंबकर, पंकज चव्हाण, प्रेम सूर्यवंशी, प्रीती केसरकर, मंजुषा जोशी, मयुरी भोंडे, स्वप्निल खंबायत आणि संतोष रासने यांनी केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
गट १ (पहिली-दुसरी): दिविशा गुगळे, गौरी कुंमरे, विहा चव्हाण, अन्वी कलंत्री, ओवी जाधव, प्रवाया भरडे.
गट २ (तिसरी-चौथी): वैष्णवी सरगर, मृण्मयी साकोरे, इनाया शेख, आराध्या पाठक, अन्वी गवळी, तेजस्विनी गायकवाड, संस्कृती मांडवगडे, देविका कुमार, सिद्धेश चौधरी, श्रीपाद नाळे, प्रत्युषा राठोड.
गट ३ (पाचवी-सातवी): निधी साळुंखे, सीया पाटील, गौरी धरमे, स्वप्निल जाधव, श्रावणी चौधरी, राजविका धुमाळ, साईराज क्षीरसागर, आराध्या अदक, स्वरा चंदनगिरे, वेदिका हांडे, साजिद शेख, मयूर कीर्तने, सृष्टी बागुल, श्रेयस गर्जे, स्वराज दहिफळे, ओमराज कान्हुरकर, सायली काळे, अश्विनी कांबळे, भार्गवी बोरुडे, मैथली परदेशी, ओवी कलंत्री, ऋग्वेद पाठारे.
गट ४ (आठवी-दहावी): भूमी सूर्यवंशी, समृद्धी सातपुते, उमंग दुसाने, श्रेया सानप, सायली पवार, हर्षाली टुंबरे, वैष्णवी उमाप, साक्षी सातपुते, पायल पवार, इशिका डोमाळे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.