पुणे

शिक्रापुरातून सोन्याचे दागिने पळविणारा बीडमधून जेरबंद

CD

शिक्रापूर, ता. ५ : येथील चाकण चौकातून एका महिलेची फसवणूक करून तीन तोळे सोन्याचे दागिने पळविणाऱ्या सराईत चोरट्याला शिक्रापूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने बीडमधून अटक केली. अभिमान बाबू तुपे (वय ४९, रा. पिठ्ठी निरगुडी, ता. पाटोदा, जि. बीड), असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी माहिती दिली की, शुक्रवारी (ता. २) दुपारी करंदी येथील नंदा गणपत दरेकर (वय ५२) खंडाळे येथे जाण्यासाठी चाकण चौकात थांबल्या होत्या. आरोपीने त्यांच्याशी गप्पा मारून विश्वास संपादन केला आणि त्यांना तळेगाव रस्त्यावरील एका झाडाखाली नेले. तिथे त्याने दरेकर यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या आणि गळ्यातील पानपोत काढून घेत, त्यांच्या हातात सोन्यासारखे दिसणारे बनावट बिस्कीट ठेवले. घरी गेल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दरेकर यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या आधारे आरोपीचा माग काढत तपास पथकाने थेट बीड शहरातून त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस फौजदार लहानू बांगर, पोलिस हवालदार बापू हाडगळे, विश्वंभर वाघमारे व शिवाजी चितारे यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: लग्नसराई सुरू होताच सोनं महागलं! 3 आठवड्यांच्या घसरणीला ब्रेक; मुंबई पुण्यासह तुमच्या शहरात किती झाला भाव?

IND vs NZ, 1st Test: भारताची विजयाची संधी हुकली, न्यूझीलंडची चिवट झुंज यशस्वी; पहिली कसोटी 'ड्रॉ'

रश्मिका मंदाना संतापली! कुटुंबीयांना ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं; म्हणाली, 'मी गप्प बसत नाही'

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धीवर भीषण अपघात, बस डिव्हायडरला धडकली; दोघांचा मृत्यू, ३० जण जखमी

Latest Marathi News Live Update: शंभराव्या संमेलनाच्या अध्यक्षांची उद्या निवड

SCROLL FOR NEXT