Shila temple complex in Lohgaon dangerous due to sewage people health affect because open drainage water Sunil Tingre pune sakal
पुणे

सांडपाण्यामुळे लोहगावमधील शिळा मंदिर परिसर बनला आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक

मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांच्या विकास निधीतून बंदिस्त गटार योजनेसाठी निधी आला होता.

रूपाली अवचरे

विश्रांतवाडी - लोहगावमधील कोपरआळी येथील शिळा मंदिर परिसर त्यासमोर साचलेल्या सांडपाण्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांना तेथे राहणे, मंदिरात दर्शनाला येणे, अवघड झाले आहे. डासांमुळे मलेरियासारखे आजार बळावले आहेत. संत तुकाराम महाराजांचे आजोळ असलेल्या श्री क्षेत्र लोहगाव येथील ऐतिहासिक शिळामंदिरासमोर असलेल्या मोकळ्या जागेवर स्थानिक रहिवाशांचे, नवीन झालेल्या गृहप्रकल्पांचे, तसेच वडगाव शिंदे रस्त्यावरून येणारे सर्व सांडपाणी साचत आहे. सांडपाण्यामुळे या परिसराला गटारगंगेचे रूप आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांच्या विकास निधीतून बंदिस्त गटार योजनेसाठी निधी आला होता. त्यानुसार कामही सुरू झाले होते. परंतु स्थानिक जागा मालकाने त्याच्या जागेतून सांडपाणीवाहिनी टाकण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे हे काम रखडले आहे. 2019 पासून पुणे मनपाकडे वारंवार पाठपुरावा करूनही काही उपयोग होत नसल्याने एका महिन्यामध्ये हा प्रश्‍न निकाली न निघाल्यास आरोग्य विभागासमोर फार मोठे ठिय्या आंदोलन शिवसेना शाखा, लोहगाव , शिळा मंदिर ट्रस्ट व स्थानिक नागरिकांच्या वतीने उभारले जाईल, असा इशारा शिवसेनेचे विभागप्रमुख सोमनाथ खांदवे यांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी एकनाथ खांदवे, संजय मोझे, वसंत खांदवे, राजाराम मोझे, गोविंदा मुरकुटे, सचिन खांदवे, ह भ. प. अशोक खांदवे,लीला खांदवे, द्वारका मुरकुटे आणि इतर उपस्थित होते.

यासंदर्भात येथील वंदना रवींद्र धिवार म्हणाल्या की सांडपाणी वाढल्यामुळे पावसाळ्यात तर येथे नदीचे स्वरूप येते. या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी फार वाढली आहे. त्यामुळे मंदिरात भजनाला, हरिपाठाला येऊन बसलो तरी वासामुळे बसवत नाही. इंदूबाई बाळासाहेब थोरात म्हणाल्या की या सांडपाण्यामुळे आमच्या परिसरातील मुलांचे, ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुलांच्या अंगावर गांधील आल्यासारखे फोड उठतात. येथे राहणेही मुश्किल झाले आहे. मोठमोठ्या इमारतींना परवानगी देतात, तेव्हा त्यांच्या सांडपाण्याची व्यवस्था का करत नाहीत? समस्येचे निराकरण लवकर झाले नाही तर आम्ही आंदोलन करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT