पुणे

शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणी आरोपींना कोठडी

CD

वाकड, ता. २८ : वाकड येथील विवाहिता शिल्पा सचिन गवारे यांच्या आत्महत्या प्रकरणी अटक झालेल्या सासरच्या चार आरोपींना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. शिल्पा यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे गुरुवारी (ता. २७) पहाटे उघडकीस आले. याप्रकरणी त्यांचे भाऊ संतोष कलाटे यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी शिल्पा यांचा पती सचिन उत्तम गवारे, सासरा उत्तम शिवराम गवारे, सासू संजीवनी उत्तम गवारे आणि दीर संदीप उत्तम गवारे यांना अटक केली आहे. माहेरून पैसे आणण्यासाठी तसेच वडिलोपार्जित मालमत्तेचा हिस्सा मिळावा म्हणून शिल्पा यांचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विविध बाबींचा तपास, चौकशी आणि इतर पुरावे संकलित करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाने मान्य केली.
दरम्यान, सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कलाटे कुटुंबीयांनी केली आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे यांची सूचना
शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी वाकड पोलिसांची भेट घेऊन तपासाबाबत माहिती घेतली. आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी सखोल तपास करण्याची सूचना त्यांनी दिली.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT