पुणे

जिल्ह्यातील पहिली जलजीवन योजना पूर्णत्वास

CD

गुनाट, ता. २४ : जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या शिंदोडी (ता.शिरूर) नळपाणीपुरवठा योजनेचे "''जल अर्पण दिनाचे'' औचित्य साधून शनिवारी (ता. २१) लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे शिंदोडी ग्रामस्थांचा शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता कायमचा मार्गी लागला आहे. ३ कोटी ९३ लाख रुपयांची ही योजना पूर्ण झाली. लोकार्पण केलेली जिल्ह्यातील पहिलीच योजना ठरली आहे.
दरम्यान, जल अर्पण दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने प्रभात फेरीचे आयोजन करून पाणी वापराविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. तर ढोल-ताशांच्या गजरात उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. लोकार्पणानंतर ग्रामस्थांना पाणी प्रणाली यंत्रणेच्या सामूहिक जबाबदारीची व पाण्याच्या सुयोग्य वापराची शपथ देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य वृषाली वाळके, पंचायत समिती सदस्य दीपक पवार, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट, उप अभियंता सतीश पवार, सहायक अभियंता रमेश व्हनमाने, शाखा अभियंता वैभव कोकरे, प्रतीक देवर्डे, आकाश अर्जूने, उत्कर्ष वासनिक, तालुका समन्वयक शबाना शेख, आदी शासकीय पदाधिकाऱ्यांसह सरपंच अरुण खेडकर, उपसरपंच गौतम गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी शीतल कापरे यांसह गावातील विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पाण्याची शुद्धता १०० टक्के
नळाद्वारे येणारे पाणी हे खरंच शुद्ध आहे का? हा ग्रामस्थांचा गैरसमज दूर करण्यासाठी नदीतील अशुद्ध पाण्यातील घटकांचे विघटन करून पाणी शुद्धीकरण कसे केले जाते याचा ग्रामस्थांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकच उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दाखवले. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्यासाठी मिळणारे पाणी कसे शुद्ध होते हे प्रत्यक्षात अनुभवले.

पिण्यासाठी शुद्ध पाणी हा नागरिकांचा प्रथम अधिकार आहे. जलजीवन पाणीपुरवठा योजना या खरोखरच ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यासाठी वरदान ठरणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद गटातील ज्या काही पाणीपुरवठा योजना निधीअभावी अपूर्णावस्थेत आहेत त्या पूर्णत्वास जाण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत.
-वृषाली वाळके, सदस्य, न्हावरे-शिरूर ग्रामीण जिल्हा परिषद गट

नागरिकांचे बहुतांश आजार हे पाण्यातूनच होतात. म्हणूनच नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी व त्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलजीवनचे काम वेगाने सुरू आहे. तालुक्यात प्रथम शिंंदोडीकरांंना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देऊ शकलो याचेच समाधान आहे.
- अमित पाथरवट, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

SCROLL FOR NEXT