पुणे

संघटित गुन्हेगारीविरोधात श्रीरामपूर पोलिसांची मोठी कारवाई

CD

संघटित गुन्हेगारीविरोधात श्रीरामपूर पोलिसांची कारवाई

श्रीरामपूर, ता. २६ : शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत संघटित गुन्हेगारीविरोधातील कठोर तरतुदींचा वापर करत पाच जणांच्या टोळीवर कलम १११ लागू केले आहे. शहर पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी साईनाथ शिवकुमार जाधव, राहुल ऊर्फ भीमण्या भीमराज बागूल, सुजित संजय कोळगे, रितेश बाबासाहेब आढाव आणि धनराज सुनील जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

जुन्या वादातून फिर्यादीला शिवीगाळ करून कोयता, चाकू, लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात राहुल बागूल, सुजित कोळगे, रितेश आढाव आणि धनराज जाधव यांना अटक करण्यात आली असून, साईनाथ जाधव अद्याप फरार आहे.

या आरोपींविरुद्ध यापूर्वीही खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारहाण, बेकायदा शस्त्रांचा वापर, दरोडा, दुखापत अशा गंभीर स्वरूपाचे एकूण आठ गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल असल्याचे तपासात समोर आले. आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी तयार करून सातत्याने गुन्हे केल्याचा ठपका ठेवत उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांनी कलम १११ लागू करण्याचा प्रस्ताव अपर अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे पाठविला होता. प्रस्तावाची छाननी केल्यानंतर त्यास मंजुरी देण्यात आली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विशाल खैरे व त्यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदार कल्याणशेट्टींना मिळणार वाढीव पोलिस बंदोबस्त! जीवे मारण्याच्या धमकीनंतर पोलिस अधीक्षक कार्यालयाने मागविला अक्कलकोट उत्तर पोलिसांकडून अहवाल, वाचा...

माझी भूमिका : ‘वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल’

१३ ऑगस्ट २०२६ पंचांग! श्रावणमासाला आजपासून सुरुवात; जाणून घ्या शुभ-अशुभ वेळा

आजचे राशिभविष्य - 13 ऑगस्ट 2026

Green Moong Dal Ladoo: साखर-गूळ नाही तरी चव भन्नाट! असे बनवा हिरव्या मूगडाळीचे प्रोटीनयुक्त लाडू

SCROLL FOR NEXT