शिर्डी-हैदराबाद एसटी बससेवा सुरू
अहिल्यानगर, ता.२८ ः राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोपरगाव आगारामार्फत शिर्डी ते हैदराबाद एस. टी. बससेवा सुरू करण्यात आली असून, बसफेरी रोज संध्याकाळी ५ वाजता मार्गस्थ होऊन नगरमधील तारकपूर बसस्थानक येथे संध्याकाळी ७.१५ व स्वस्तिक बसस्थानक येथून संध्याकाळी ७.३० वाजता सुटणार आहे.
ही बस जामखेड, भूम, येरमाळा, येडशी, धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा, बसवकल्याण फाटा, हुमनाबाद, जहिराबाद, संगारेड्डी, लिंगमपल्ली मार्गे हैदराबाद येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता हैद्रादराबाद येथील एमजीबीएस (महात्मा गांधी बसस्थानक) येथे पोहोचेल, तसेच परतीचा प्रवास दररोज संध्याकाळी एमजीबीएस (महात्मा गांधी बसस्थानक) येथून संध्याकाळी ६ वाजता सुटेल. बस आरक्षण सेवेला उपलब्ध असून, सदर बससेवेचा प्रवाशांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोपरगाव आगारातर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.