Electric Motor Theft gang arrested sakal
पुणे

Shirur Crime : शेतकरी वर्गाला दिलासा! कृषिपंप (मोटारी) व केबल चोरणारी टोळी जेरबंद

कृषिपंपांना (मोटारी) लक्ष्य करून अनेक मोटारी व केबल चोरून नेत चोरट्यांनी उच्छाद मांडला असताना, शिरूर पोलिसांनी चौघांच्या टोळीला जेरबंद केले.

नितीन बारवकर

शिरूर - बेट भागात, नदीकिनारी लावलेल्या कृषिपंपांना (मोटारी) लक्ष्य करून अनेक मोटारी व केबल चोरून नेत चोरट्यांनी उच्छाद मांडला असताना, शिरूर पोलिसांनी चौघांच्या टोळीला जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीच्या बारा मोटारी व केबल मिळून दीड लाख रूपयांचे साहित्य जप्त केले. या टोळीकडून मोटार व केबल चोरीचे दहा गुन्हे उघडकीस आल्याने बेट भागातील शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी नदीकिनारी लावलेले कृषि पंप व त्यांना जोडलेली केबल चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. तालुक्याच्या बेट भागातील टाकळी हाजी, जांबूत, पिंपरखेड तसेच शिरूर जवळील अण्णापूर, आमदाबाद व इतर भागातून अशा चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने व मोटारींअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदील झाला होता.

या पार्श्वभूमीवर अशा चोरीच्या घटनांची गांभीर्याने दखल घेण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी दिल्या होत्या. त्यानूसार पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले व एकनाथ पाटील यांची स्वतंत्र पथके तयार करून या मोटार चोरीवर व संशयित चोरांच्या हालचालीवर गेले काही दिवस बारीक लक्ष ठेवले.

सहायक फौजदार माणिक मांडगे, पोलिस नाईक धनंजय थेऊरकर, विनोद मोरे, पोलिस कॉन्स्टेबल रघुनाथ हाळनोर, सुरेश नागलोत, विशाल पालवे, दिपक पवार, विष्णू दहिफळे या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे वैभव सुरेश पाराटे, (वय २३), गौरव रामचंद्र पाराटे (वय १९), सुरेश मारूती पाराटे (वय ६०, तिघे रा. टेमकर वस्ती, टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे) या मोटारी व केबल चोरणारांसह या चोरीच्या मोटारी विकत घेणारा भंगार व्यावसायिक रज्जाक दाऊद शेख (वय ५९, रा. हल्दी मोहल्ला, शिरूर) यांची टप्प्याटप्प्याने धरपकड केली. दरम्यान, पोलिस चौकशीत त्यांनी गु्न्ह्याची कबूली दिली. त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रूपये किंमतीच्या १२ मोटारी व केबल असे साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राऊत यांनी दिली. या टोळीकडून दहा गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडे अधिक तपास केला जात आहे.

पिकांना पाणी देण्यासाठी नदीकिनारी लावलेल्या कृषि पंपांचे संरक्षण करण्यासाठी परिसरातील शेतकरी बांधवांनी आपापसात गट तयार करावेत व रात्रीच्या वेळी आळीपाळीने गस्त घालावी. या गटांना ठराविक काळासाठी पोलिस मदतही दिली जाईल. इतर काही मोटार चोरांबाबत माहिती असल्यास ती पोलिसांना कळवावी. संबंधितांचे नाव गुप्त ठेवून मोटार चोरांवर जरब बसेल अशी कारवाई केली जाईल.

- सुरेशकुमार राऊत, पोलिस निरीक्षक, शिरूर पोलिस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT