Dilip Walse Patil inspects drought-affected crops and interacts with farmers in Pabal and surrounding villages of Shirur taluka.

 

esakal

पुणे

Shirur Drought,: पिकांना पाणी देणे कठीण; उभी पिके जळण्यास सुरुवात, तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना

Shirur Drought, Crop Damage, Dilip Walse Patil : पावसाअभावी पाबळ, केंदूर, कान्हूर मेसाई, धामारी, वरूडे व मोराची चिंचोली परिसरात दुष्काळाची तीव्रता वाढली असून सोयाबीन, बटाट्यासह विविध पिकांचे नुकसान होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पाबळ, : पावसाने ओढ दिल्याने शिरूर तालुक्यातील पाबळ, केंदूर, कान्हूर मेसाई, धामारी, वरूडे व मोराची चिंचोली परिसरातील गावांमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे. पाण्याअभावी शेतातील पिके करपण्यास सुरुवात झाली असून, सोयाबीन, बटाट्यासह विविध पिकांचे नुकसान होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी (ता. ३) नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांकडून पिकांची स्थिती, पाणी व चाऱ्याची उपलब्धता तसेच झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. पावसाअभावी पिकांना पाणी देणे कठीण झाले असून, अनेक ठिकाणी उभी पिके जळून चालली असल्याने मोठा फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा सूचना वळसे पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. दुष्काळसदृश परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी असेही त्यांनी सांगितले.

या कठीण काळात शेतकरी बांधवांनी चिंता करू नये. शासन-प्रशासनाकडून शक्य ती जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत," असा विश्वास वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले, पंचायत समिती सदस्या वंदना पवार, मानसिंग पाचुंदकर, प्रकाश पवार, सदाशिव पवार, राजेंद्र जासूद, बबन शिंदे, प्रमोद पऱ्हाड, सोपान जाधव, प्रवीण ढोकले, संतोष लंघे, विमल नाणेकर, भास्कर पुंडे, सुधीर पुंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st Test: शुभमन गिलने टॉस जिंकला! सिराज-जडेजाला मात्र बाहेर बसवलं, कोणाला मिळाली Playing XI मध्ये संधी?

अमेरिकेने इराणविरुद्धच्या युद्धात एक्स्पायर झालेली क्षेपणास्त्रे वापरली; सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीसमोर सुनावणी

Truck Bike Accident : तेरवीहून परतताना पती-पत्नी ठार; शिंदोला मार्गावर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात

Chadrapur Crime : चंद्रपूर हादरले! चौकात कवटी, रेल्वे पटरीलगत मृतदेह; दोन्ही अवयव एकाच व्यक्तीचे असल्याचा संशय

Dengue-Like Infection : मुंढेत ४० जणांना डेंगीसदृश्य लागण; गावात खळबळ

SCROLL FOR NEXT