murder esakal
पुणे

Shirur Crime : सतत दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीनेच दाबला गळा

चारित्र्याच्या संशयावरून सतत दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीनेच गळा दाबून खून केल्याची घटना रांजणगाव सांडस (ता. शिरूर) जवळील राक्षेवाडी येथे काल घडली.

नितीन बारवकर

चारित्र्याच्या संशयावरून सतत दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीनेच गळा दाबून खून केल्याची घटना रांजणगाव सांडस (ता. शिरूर) जवळील राक्षेवाडी येथे काल घडली.

शिरूर - चारित्र्याच्या संशयावरून सतत दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीनेच गळा दाबून खून केल्याची घटना रांजणगाव सांडस (ता. शिरूर) जवळील राक्षेवाडी येथे काल घडली.

विलास उर्फ विकास गलचंद चव्हाण (वय ३२, रा. मोहारडा तांडा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजी नगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांचे बंधू गोविंद गलचंद चव्हाण (रा. कासारसाई, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी मृत चव्हाण यांच्या पत्नी सविता विलास चव्हाण (वय ३०) यांना अटक केली. आज त्यांना शिरूर न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, विलास चव्हाण व त्यांच्या पत्नी सविता हे कन्नड तालुक्यातील दांपत्य सध्या रांजणगाव सांडस जवळील राक्षेवाडी येथील दत्तात्रेय लक्ष्मण शिंदे यांच्या उसाच्या गुऱ्हाळाजवळील पत्र्याच्या खोलीत वास्तव्यास होते. विलास चव्हाण हे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत व दारू पिऊन सतत मारहाण करीत असत.

काल रात्रीही त्यांच्यात याच कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. त्यात विलास याने पत्नीला मारहाण केली. त्याचा राग मनात धरून सविता चव्हाण हिने पहाटेच्या सुमारास विलास यांचा गळा दाबला त्यात त्यांचा मृत्यु झाला.

या खूनप्रकरण सविता चव्हाण यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT