shivajirao adhalrao patil vs amol kolhe Sakal
पुणे

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

अमोल कोल्हेंकडून दुसरा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट

सकाळ वृत्तसेवा

शिरूर - शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपले प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आव्हान स्वीकारल्यानंतर सोमवारी (ता. ६) दुसरा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. आढळराव पाटील आपल्या खासदारकीचा वापर कशा पद्धतीने स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी करत होते, हे या व्हिडिओत पुराव्यासह स्पष्ट केलं आहे.

जुन्नर तालुक्यातील ओतूरमध्ये जाहीर सभेत डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटील यांनी आपल्या खासदारकीच्या काळात स्वतःच्या कंपनीचा फायदा लक्षात घेत केवळ संरक्षण खात्याविषयी कसे प्रश्न विचारले, असे सांगत ‘आढळराव पाटील हे लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी आहेत,’ असा आरोप केला होता. त्यावर आढळराव पाटील यांनी डॉ. कोल्हे यांना, ‘पुरावे सादर करा,’ असे आव्हान दिले होते.

आढळराव यांनी केवळ लोकसभेत संरक्षण खात्याविषयी विचारलेले प्रश्नच कोल्हे यांनी जनतेसमोर मांडले. सोमवारी याच संदर्भातला दुसरा व्हिडिओ डॉ. कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. यामध्ये डॉ. कोल्हे सांगतात, ‘डायनालॉग ही आढळराव पाटलांची जी कंपनी आहे, त्या कंपनीच्या वेबसाइटवर ही सर्व माहिती उपलब्ध आहे.

संरक्षण खात्याला विविध साहित्य पुरवणाऱ्या कंपनीचे मालक आणि तत्कालीन खासदार आढळराव पाटील यांनी २९ एप्रिल २०१६ ला विचारलेला प्रश्न या व्हिडीओत जनतेसमोर मांडला आहे. भारत सरकारने संरक्षण खात्याला लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीचे धोरण तयार केलं आहे का?

यामध्ये भारतीय कंपन्यांसाठी धोरण आहे का? आणि केलं असेल तर त्याची सविस्तर माहिती द्यावी, असा प्रश्न आढळराव पाटील यांनी विचारला आहे. या प्रश्नांचा आणि शिरूर लोकसभेचा काय संबंध? याचं उत्तर आढळराव पाटील यांनी द्यावं, असे आव्हान पुन्हा एकदा डॉ. कोल्हे यांनी दिले आहे.

‘नेत्यांनी उत्तरं द्यावीत’

निवडणूक प्रचारात माझ्याबद्दल ‘नेता की अभिनेता?’ हा प्रश्न अनेक जण विचारतात, असे सांगत डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘आता आढळराव पाटील यांच्यासाठी मत मागणाऱ्या नेत्यांनी उत्तर द्यावीत की, नेत्याच्या रूपात स्वतःच्या कंपनीचे उखळ पांढरे करणारा लोकप्रतिनिधी हवा, की सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणार लोकप्रतिनिधी हवा?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: रुपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा! राजीनाम्याचं कारणही सांगितलं

धर्मांतर कायद्यानंतर आता UCC! महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करणार? विवाह, वारसा, घटस्फोट नियमांमध्ये होणार बदल

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT