पुणे

दोन गटांतील राडाप्रकरणी शिरूरमध्ये ३० जणांवर गुन्हे

CD

शिरूर, ता. ३१ : शिरूर पोलिस ठाण्यासमोर शुक्रवारी (ता. ३०) दुपारी दोन गटांत झालेल्या हाणामारीची दखल घेत पोलिसांनी ३० जणांविरुद्ध शनिवारी (ता. ३१) गुन्हा दाखल केला. तसेच दोन्ही बाजूंनी दिलेल्या तक्रारींनुसार ४० जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
दोन गटांतील या वादात दगडफेक, चपलांचा वर्षाव, चावा घेणे आणि डोळ्यांत मिरची पूड टाकण्याचे प्रकार घडले. लोखंडी रॉड व दांडक्याने केलेल्या हल्ल्यात काहींची डोकी फुटली, तर एकाचा पाय फ्रॅक्चर झाला. पोलिस अंमलदार सोनाजी मुरलीधर तावरे यांच्या फिर्यादीवरून ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून १९ जणांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी सांगितले.
याप्रकरणी अनिता उत्तम लकडे (वय ४०, रा. शिंदेवाडी, मलठण, ता. शिरूर) यांच्या फिर्यादीवरून १८, तर ज्ञानेश्वर संपत शिंगाडे (रा. शिंगाडवाडी, ता. शिरूर) यांच्या फिर्यादीवरून २२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मारामारीत अनिता लकडे, महेश लकडे, उत्तम लकडे, अनिल कोळपे, माखा कोळपे, गणेश लकडे, अक्षय शिंदे, सुनील कोळपे, राहुल कोळपे, तसेच दुसऱ्या बाजूचे ज्ञानेश्वर संपत शिंगाडे, लंकाबाई शिंदे, पंखाबाई शिंदे, समीर शेंडगे व गणेश शिंदे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एका प्रेमविवाहाच्या प्रकरणातून महिनाभरापासून दोन्ही बाजूंमध्ये धुसफूस सुरू होती. पळून जाऊन विवाह केलेले तरुण-तरुणी पोलिसांसमोर हजर झाले. मुलीने स्वमर्जीने विवाह केल्याचे सांगितल्यावर दोन्ही कुटुंबीयांत वादाला सुरुवात झाली. पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्याचे काम सुरू असतानाच बाहेर तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करूनही जमाव ऐकत नव्हता. अखेर जादा कुमक मागवून २० ते २५ जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक राहुल भागवत व गोविंद खटींग यांनी शिंदेवाडी येथे भेट देऊन पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh protests : बांगलादेशात पुन्हा असंतोषाचा उद्रेक! वेतनवाढीसाठी हजारो कामगार रस्त्यावर; ढाका-गाझीपूरमध्ये जाळपोळ

Nagpur Sarafa Bishnoi Gang Threat : नागपुरातील सराफांना बिश्नोई टोळीची धमकी, व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण

Drought Resistant Crop: दुष्काळात शेतकऱ्याला ओव्याचा आधार; कमी पाण्यात, कमी खर्चात हमखास उत्पन्नाची आशा

Pali Nagar Panchayat: करवाढीपूर्वी विकासकामांचा हिशेब द्या! अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरपंचायतीवर २ नोव्हेंबरला धडकणार ‘संघर्ष मोर्चा’

Pune Rain Update : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला! औंधमध्ये जोरदार सरी, शहरातील अनेक भागांत पाऊस; पुणेकरांनी तारांबळ

SCROLL FOR NEXT