Maratha Reservation Esakal
पुणे

Maratha Reservation: 'मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्या'; खासदार अमोल कोल्हेंना आंदोलकाचा फोन, ऑडिओ क्लिप व्हायरल?

मराठा आरक्षणासाठी कोल्हे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी ऑडिओ क्लिपमध्ये केलीय.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. शांततेत सुरू असणाऱ्या आंदोलनाला कालपासून हिंसक वळण लागलं आहे. अशातच मराठा आरक्षणाला पाठिंबा देत काही नेत्यांनी राजीनामा दिला आहे, तर काही नेत्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. या दरम्यान शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा अन् केंद्र सरकारवरचा दबाव वाढवावा अशी मागणी एका मराठा बांधवाने केल्याची माहिती आहे.

खासदार अमोल कोल्हे यांच्यासारखाच आवाज असणारी संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. या ऑडिओ क्लिप मधीलतील आवाज हा खासदार कोल्हे यांचाच आहे, याबाबतची पुष्टी 'सकाळ' करत नाही.

काय आहे व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये?

'सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, अशावेळी केवळ आमदारांनी आणि खासदारांनी राजीनामे देऊन प्रश्न मिटणार नाही. तर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस खासदारांनी राजीनामे देऊन केंद्र सरकारवरील दबाव वाढवावा. कारण मराठा आरक्षण हे राज्य सरकार नाही तर केंद्र सरकारच देऊ शकते, अशी मागणी व्हायरल झालेल्या फोनवर खासदार कोल्हे यांच्याशी बोलताना मराठा बांधवाने केली आहे.

मात्र तरीही तुम्ही राजीनामा द्याल आणि त्याची आम्ही वाट पाहू असं समोरील व्यक्तीने म्हटलं आहे. तर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस खासदारांनी राजीनामे देऊन केंद्र सरकारवरील दबाव वाढेल, असंही त्या व्यक्तीने म्हटलं आहे. कोल्हे यांच्या सारखाच आवाज या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचं बोललं जातंय. पण हा आवाज खासदार कोल्हे यांचाच आहे, याबाबतची पुष्टी 'सकाळ' करत नाही.

मराठा आरक्षणासाठी बीडच्या भाजप आमदारांचा राजीनामा

बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहित आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

खासदार हेमंत गोडसे यांचा राजीनामा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी राजीनामा दिला आहे. त्या आधी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपला राजीनामा दिला होता. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता दोन खासदारांनी राजीनामे दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बोनसवंचित कंत्राटी आरोग्य कर्मचारी आंदोलनाचे शस्त्र उगारणार, महापालिका आयुक्तांसोबतच्या भेटीत मागणी मान्य होणार?

Suhas kande : जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय खेळी! आमदार सुहास कांदेंकडे नाशिक शिवसेनेची धुरा

ऐन दिवाळीत तंत्रज्ञानाचा फुसका बार! Canva अन् Amazon ची सेवा ठप्प; युजर्सला येतायेत अडचणी...

Health Benefits Chickpeas: गर्भधारणेत आवश्यक फॉलिक ॲसिड, कॅल्शिअम आणि लोह देणारे 'नैसर्गिक टॉनिक' म्हणजे चणे!

'पुन्हा शिवाजीराजे भोसले’मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बालकलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका

SCROLL FOR NEXT