shirur  
पुणे

शिरूरच्या पोलिसांची दबंगगिरी, तीन तासांत दरोडेखोरांच्या अशा आवळल्या मुसक्या 

नितीन बारवकर

शिरूर (पुणे) :  पोकलेन घेऊन जाणारा कंटेनर अडवून तिघांना मारहाण करत मोबाईल व वाहनांच्या बॅटऱ्या चोरून पळून जाणाऱ्या पाच जणांना शिरुर पोलिसांनी अण्णापूर व मलठण येथील ग्रामसुरक्षा दल आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जेरबंद केले. 

शिरूर- पाबळ रस्त्यावर आमदाबाद फाट्याजवळ बुधवारी (ता. 1) रात्री साडेदहाला हा दरोड्याचा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून एकच्या सुमारास दरोडेखोरांच्या मुसक्‍या आवळल्या. अविनाश शहाजी कारखिले (रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर, जि. नगर), योगेश पुंडलिक मदगे व सुनील अशोक घावटे (दोघे रा. शिरूर), सचिन कारभारी मदगे (रा. शिरूर) व रवी बाळशिराम झंजाड (रा. अण्णापूर, ता. शिरूर) अशी अटक केलेल्यांची नावे असून, शिरूर न्यायालयाने त्यांना गुरुवारी दहा दिवसांची पोलिस कोठडी दिली. गुन्ह्यात वापरलेली मोटार पोलिसांनी जप्त केली असून, वीस हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या, दहा हजारांचे मोबाईल व पाच हजार रुपयांचा ऐवज आरोपींकडून हस्तगत केला. 

कंटेनर चालक दादा शिवाजी साळवे (रा. राशीन, ता. कर्जत, जि. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार, ते कंटेनरमध्ये पोकलेन मशिन घेऊन नारायणगावहून कर्जतकडे जात होते. शिरूर- पाबळ रस्त्यावर संशयित दरोडेखोरांनी आमदाबादजवळील मळगंगा लॉजनजिक स्कोडा मोटार आडवी घालून त्यांना थांबविले. साळवे व त्यांच्यासोबत असलेले दीपक रमेश लव्हे (रा. राशीन, ता. कर्जत) व पोकलेन ऑपरेटर अनिल रामजीवन चौधरी (रा. नगर) यांच्याकडे पैशांची मागणी करीत मारहाण केली. त्यांच्याकडील मोबाईल, वाहनांच्या बॅटऱ्या व व्हील पान्हे घेऊन ते पळून गेले. 

याबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, तसेच मुकुंद कुडेकर, जितेंद्र मांडगे, करणसिंग जारवाल, प्रवीण पिठले, राजेंद्र गोपाळे, सागर गुणवरे व यु. एस. जंगम या पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खानापुरे यांनी जाताना मलठण, अण्णापूर, टाकळी हाजी, रामलिंग, आमदाबादच्या ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांशी संपर्क साधला. काही ग्रामस्थांना कळवून तेथे पोलिसही पाठविले. ग्रामस्थांनी वाहने रस्त्यावर लावून नाकेबंदी केली. तरीही नाकेबंदी तोडून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दरोडेखोरांना पोलिसांनी अण्णापूरजवळ जेरबंद केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सश्‍याची शिकार 
दरोडेखोरांकडून जप्त केलेल्या स्कोडा मोटारीची झडती घेताना चोरीच्या मालाबरोबरच; एक मृत रानटी ससा आढळून आला. याबाबत पोलिसांनी कसून चौकशी केली असता, संबंधितांनी शिकार करून त्याला मारल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दरोड्याबरोबरच; त्यांच्याविरूद्ध दुर्मिळ जंगली प्राण्याच्या बेकायदा शिकारीप्रकरणीही गुन्हा दाखल केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT