पुणे

शिरूरमधील भंगार चोरीप्रकरणी आंदोलनाला संघटनांचा पाठिंबा

CD

शिरूर, ता. १४ : शिरूर नगर परिषदेच्या हद्दीतील सुमारे ४० लाख रुपये किमतीच्या भंगार साहित्य चोरीप्रकरणी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेल्या सत्याग्रह आंदोलनाला आज दुसऱ्या दिवशी विविध संघटनांनी पाठिंबा दिला. पोलिसांशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.
शिरूर नगर परिषदेच्या सेंटर शाळेच्या मैदानावर ठेवलेले पाच घंटागाड्या, टॅंकर, जप्त केलेल्या लोखंडी टपऱ्या व इतर सामान जून २०२२ मध्ये गायब झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असला तरी, तपासात प्रगती नसल्याचा आरोप करत शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी मंगळवार (ता. १३) पासून पोलिस ठाण्यासमोर सत्याग्रह सुरू केला आहे. नगर परिषदेतीलच एका अधिकाऱ्याने हे साहित्य गायब केल्याचा आरोप बांडे यांनी केला आहे. दरम्यान, नगर परिषदेने हे आरोप फेटाळले असून पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचे स्पष्ट केले आहे.
सहायक पोलिस निरीक्षक नितीन केणेकर, उपनिरीक्षक शुभम चव्हाण व राकेश मुळीक यांनी आंदोलकांशी चर्चा केली. पुरावे सादर केल्यास कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले. मात्र, चोरीची फिर्याद देणाऱ्यांचीच चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. या आंदोलनास शिरूर चालक युनियन, रिक्षा पंचायत, लहूजी शक्ती सेना आदींनी पाठिंबा दर्शविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात भररस्त्यात थरारक गोळीबार; डोक्यात २ गोळ्या झाडून हरीश गजवानींची निर्घृण हत्या!

Ladakh Development Boost : लडाखला ३,३५० कोटींच्या विकास प्रकल्पांची भेट! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लेह विमानतळासह सामरिक रस्त्याचे लोकार्पण

Strait of Hormuz: मोठी दुर्घटना! 'होर्मुज'मध्ये अडीच हजार कंटेनर्स बुडाले; मालवाहू जहाज धडकलं, सप्लाय चेनवर होणार परिणाम...

IND vs WI, 4th T20I: शे होपची बॅट पुन्हा तळपली, ठोकलं ५० चेंडूत शतक; भारताला विजयासाठी पार करावं लागणार विक्रमी टार्गेट

Pune News : खासगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT