पुणे

शिरूरच्या पर्यटन विकासाला हवी नवी गती

CD

संजय बारहाते, टाकळी हाजी (ता. शिरूर)

एकेकाळी दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा शिरूर तालुका आज कृषी, औद्योगिक आणि पर्यटन विकासामुळे स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे. चासकमान, डिंभा, मीना शाखा, थिटेवाडी तसेच घोड प्रकल्पामुळे तालुक्याची दुष्काळी ओळख पुसली जाऊन परिसर हिरवागार झाला आहे. रांजणगाव गणपतीसारख्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे शिरूर तालुका औद्योगिकदृष्ट्याही देशाच्या नकाशावर झळकू लागला आहे.
पुणे महानगर परिसराचा चौफेर विस्तार होत असताना शिरूर तालुक्यातील ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. मात्र नियोजनाच्या अभावामुळे, निधीची कमतरता, वाहतूक कोंडी व रस्त्यांची दुरवस्था यामुळे या पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचताना पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी व बलिदान स्थळ हे शौर्य, त्याग व स्वाभिमानाचे प्रतीक आहे. येथे राज्य शासनाने सुमारे ४०० कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला असून जागतिक दर्जाचे संग्रहालय, नदीकाठ सुशोभीकरण व दोन्ही स्थळांना जोडणारा पूल प्रस्तावित आहे. मात्र, वाढती गर्दी लक्षात घेता रस्ते, पार्किंग व निवास व्यवस्थेची तातडीने आवश्यकता आहे. तुळापूर येथील कामांना गती मिळत असली तरी वढू येथील कामे वेगाने पूर्ण होणे गरजेचे आहे.
अष्टविनायकांपैकी एक असलेले रांजणगावचे महागणपती हे जागृत देवस्थान असून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अष्टविनायक महामार्गाने हे ठिकाण जोडलेले असले तरी पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मंदिर परिसरात रस्ता ओलांडताना भाविकांचे जीव धोक्यात येत असून येथे उड्डाणपुलाची उभारणी काळाची गरज बनली आहे.
टाकळी हाजी येथील जगप्रसिद्ध रांजण खळगे हे निसर्गाचे अद्‌भुत देणे असून गिनीज बुकमध्ये त्याची नोंद आहे. देशभरातून पर्यटक, भूगोल अभ्यासक व विद्यार्थी येथे भेट देतात. येथे पर्यटन निवास व्यवस्था, बससेवा व पक्क्या रस्त्यांचे जाळे उभारल्यास पर्यटनाला निश्चितच चालना मिळू शकते. मोराची चिंचोली हे मोरांच्या मुक्त संचारासाठी प्रसिद्ध गाव असून कृषी पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. मात्र शिरूर-राजगुरुनगर महामार्गाची दुरवस्था पर्यटन विकासाच्या आड येत आहे. पाबळ येथील श्री पद्ममणी जैन तीर्थ, मस्तानीचा गड व विज्ञान आश्रम यांमुळे धार्मिक व शैक्षणिक पर्यटनालाही मोठा वाव आहे. तसेच शिरूर येथील जागृत रामलिंग देवस्थान, कवठे येथील येमाई देवी व कान्हूर येथील मेसाई देवी या ठिकाणी वर्षभर भाविकांची गर्दी असते. शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाल्यामुळे लाखो कामगार येथे कार्यरत आहेत. चाकण, भोसरी व पुणे शहराच्या जवळिकीमुळे शिरूर तालुक्यातील पर्यटन स्थळांना मोठी संधी आहे. दळणवळण सुविधा, पक्के रस्ते, निवास व्यवस्था व नियोजनबद्ध विकास झाल्यास शिरूर तालुका राज्यातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून निश्चितच पुढे येऊ शकतो.

00855, 00856

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election 2025: पुण्यातल्या भाजप-शिवसेना युतीची इनसाईड स्टोरी; 'त्या' 15 जणांची नावं आली समोर, शिवसेनेने 140 एबी फॉर्म वाटले

Sassoon Hospital : आईच्या किडनीदानातून मुलाला नवे जीवन; ससून रुग्णालयामध्ये ३५ वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया!

Maharashtra Teacher Recruitment : आता शिक्षक भरतीची प्रक्रिया 'परीक्षा परिषदेमार्फतच' होणार; उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त!

India Economy: गुड न्यूज! भारत बनला जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकलं मागे, GDP किती?

Latest Marathi News Live Update : पुण्यात आणखी एका गुंडाने भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT