पुणे

सातारा - शिरवळ जिल्हापरिषद - मकरंद पाटील विरुद्ध जय कुमार गोरे आमने सामने

CD

शिरवळ जिल्हा परिषद गटात ‘टाइट-फाइट’

मकरंद पाटील यांच्या प्रतिष्ठेची लढाई; २०१७ च्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा ‘कुरुक्षेत्र’

शिरवळ, ता. २३ : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद भूषविलेला शिरवळ जिल्हा परिषद मतदारसंघ यंदा पुन्हा एकदा राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील तीन दिग्गज मंत्र्यांचे समर्थक येथे आमने-सामने उभे ठाकल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील आणि ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वर्चस्वाची लढाई आता शिरवळच्या मैदानात रंगणार आहे.
जिल्हा परिषदेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीची पुनरावृत्ती यंदा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, त्यावेळचे प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा रिंगणात आहेत. मात्र, यावेळी चिन्हे आणि पक्ष बदलले आहेत. गेल्या वेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढलेले उदय कबुले यावेळी राष्ट्रवादीकडून आपली विजयी पताका पुन्हा फडकवण्यासाठी सज्ज आहेत, तर मागील वेळी राष्ट्रवादीकडून लढलेले भरगुडे-पाटील यंदा भाजपकडून नशीब आजमावत असून, पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरले आहेत. आपली ताकद दाखवण्यासाठी शिवसेनेकडून प्रदीप माने, अपक्ष म्हणून प्रकाश परखंदे, गुरुदेव बरदाडे, चंद्रकांत यादव व अनुप सूर्यवंशी यांचे अर्ज दाखल आहेत, तर पंचायत समिती पळशी गणासाठी शारदा जाधव (राष्ट्रवादी), अर्चना यादव (भाजप), मेघा शिंदे (शिवसेना) व उषा जाधव (वंचित बहुजन आघाडी) यांनी, तर शिरवळ गणासाठी छाया जाधव (राष्ट्रवादी) लक्ष्मी पानसरे (भाजप) मधुरा सोनवणे (शिवसेना) अपक्ष म्हणून रूपाली गिरे, तृप्ती देशमुख व रेश्मा परखंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यातील अपक्ष उमेदवारी केलेले उमेदवार कोण माघारी घेतो की पक्षाविरुद्धच शड्डू ठोकणार? हे २७ जानेवारीला कळणार आहे. राजकीय चुरस असली तरी उमेदवारांना जनतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये प्रामुख्याने शिरवळची वाढती लोकसंख्या आणि पायाभूत सुविधा, १४ गावांचा प्रलंबित पाणी प्रश्न आणि तीन उपसा सिंचन योजना, गेल्या ३० वर्षांपासूनची शिरवळ-मांढरदेवी रस्त्याची मागणी, औद्योगिक क्षेत्रातील शांतता आणि स्थानिकांना नोकरीत प्राधान्य आदी प्रचाराचे मुद्दे असतील.

चौकट

पक्षांतरामुळे वाढली रंगत
निवडणुकीपूर्वी झालेल्या मोठ्या पक्षांतरामुळे समीकरणे बदलली आहेत. नितीन भरगुडे- पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे गुरुदेव बरदाडे व स्वाती बरदाडे यांच्यासह शिवसेनेच्या शारदा जाधव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मकरंद पाटील यांची ताकद वाढली आहे. यावर्षी शिरवळ गटात एकूण ३२,६८१ मतदार असून, शिरवळ गण : १५,७०९ मतदार, पळशी गण : १६,३७४ मतदार आहेत. जिल्हा परिषदेचा विजय हा या दोन गणांपैकी कोणाकडे किती ‘लीड’ मिळते, यावरच अवलंबून असणार आहे.

----
फोटो - नितीन भरगुडे- पाटील, उदय कबुले व प्रदीप माने.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India-IndiGo नंतर Akasa Air कडूनही विमानभाड्यात वाढ; नवा फ्यूल सरचार्ज जाहीर, जाणून घ्या नवे दर...

BAN vs PAK : यांना चौकारही अडवता येत नाही... पाकिस्तानी चेंडूसकट सीमारेषेबाहेर... धाडकन आपटला, हॉस्पिटलमध्ये पोहोचला...

पोलीस आयुक्तांच्या पत्नीच्या पायाला काटा रुतला, डॉक्टर दारू पिऊन उपचारासाठी पोहोचला; नंतर जे घडलं त्यानं...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेचे नाव बदला! माजी आमदार दीपिका चव्हाण यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मोठी मागणी

Dombivali Crime : मी माझ्या बायकोची हत्या करून आलो, म्हणत स्वतःच पोलीस ठाण्यात हजर; पोलीसही चक्रावले

SCROLL FOR NEXT