Reshma Punekar sakal
पुणे

Shiv Chhatrapati Award : बारामतीकर रेश्मा पुणेकर यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

बेसबॉल मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाची कर्णधार असलेल्या बारामतीच्या रेश्मा पुणेकर यांना महाराष्ट्र सरकारचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

बारामती - बेसबॉल मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाची कर्णधार असलेल्या बारामतीच्या रेश्मा पुणेकर यांना महाराष्ट्र सरकारचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्कारासाठी 30 जून रोजी संपणारे वर्ष धरून त्या पूर्वीच्या पाच वर्षांपैकी तीन वर्षांमध्ये त्या खेळाडूने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर केलेल्या कामगिरीचे व क्रीडानैपुण्याचे मूल्यमापन केले जाते.

ग्रामीण भागामधून देशाच्या कर्णधार पदी कामगिरी करणारी रेश्मा पुणेकर या बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर दोन आंतरराष्ट्रीय सामने, चीन आणि हॉंगकॉंग मध्ये खेळले आहेत.

23 राष्ट्रीय सामन्यात महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. 28 राज्यस्तरीय सामने तसेच 4 सुवर्ण पदक, 6 रजत पदक, 3 कांस्य पदक आणि रागिणी पुरस्कार, राज्यस्तरीय खेलरत्न पुरस्कार, सरदार धुळोजी मोरे वीरता पुरस्कार अश्या अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

त्यांची एक तपाहून अधिक काळाची कामगिरी इतर खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे केवळ बारामतीचेच नव्हे तर भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर बेसबॉलमध्ये त्यांनी उंचावले आहे.

सध्या रेश्मा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील शारीरिक शिक्षण विभागात एम. पी. एड पदवी अभ्यास करत आहेत. बारामतीकर असलेल्या ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय खेळाडूला महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोच्च शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT