OZA19.jpg 
पुणे

शिवजन्मभूमीची झळाळी वाढविणार : उद्धव ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर (पुणे) : ""महाविकास आघाडीचे सरकार शिवजन्मभूमीच्या वैभवात भर घालून तिची झळाळी वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहील,'' असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किल्ले शिवनेरी येथे मराठा सेवा संघातर्फे आयोजित अभिवादन सभेत बोलताना केले. 

ठाकरे म्हणाले, ""सर्वांत जास्त गडकोट जुन्नर तालुक्‍यात आहेत. देशातील सर्वाधिक लेण्या देखील येथेच असल्याने या परिसराला अनन्य साधारण महत्त्व आहे. सिंहगडाप्रमाणे शिवनेरीवर लाईट ऍन्ड साऊंड शोची निर्मिती लवकरच करण्यात येईल. शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवर ते बोलत होते. त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवजन्मस्थळी पूजन झाल्यानंतर महिलांनी पारंपरिक पद्धतीने पाळणागित सादर केले. पोलिसांनी बंदुकीच्या फैरींची मानवंदना दिली. मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. 

शिवकुंज येथील माता जिजाऊ व बाल शिवाजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी झालेल्या छोटेखानी सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ""राज्यात खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य आले आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्याला पुढे घेऊन जाऊ. मराठा मोर्चाच्या आंदोलन प्रसंगी सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान न झालेल्या ठिकाणी दाखल केलेले आंदोलकवरील गुन्हे मागे घेण्यात येतील. मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.'' 

यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार अमोल कोल्हे, राज्यमंत्री आदिती तटकरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अतुल बेनके, अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश गोरे, अमोल मिटकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश हांडे यांनी केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT