AKK26B05895, AKK26B05896
अक्कलकोट ः येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे यांचे पूजन व आरती करताना आमदार सचिन कल्याणशेट्टी, जन्मेनजयराजे विजयसिंहराजे भोसले, अमोलराजे जनमेजयराजे भोसले, अमोलबापू शिंदे आदी
अक्क्लकोट ः छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मूर्ती व आकर्षक सजावट.
अक्कलकोटमध्ये मिरवणुकीने शिवजयंती उत्सवाची सांगता
८०० सदस्यांचे अमोलराजे लेझीम पथकाने लक्ष वेधून घेतले
अक्कलकोट, ता. २२ ः श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, वटवृक्ष देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे व मंडळाचे सुरेशचंद्र सूर्यवंशी, अन्नछत्र मंडळाचे सचिव श्यामराव मोरे, बाबासाहेब निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली संयोजक अमोलराजे भोसले मित्रमंडळ यांच्या वतीने शिवछत्रपतींच्या मिरवणुकीने शिवजन्मोत्सवाची सांगता करण्यात आली. या मिरवणुकीत अमोलराजे भोसले मित्रमंडळाचे ८०० युवकांच्या लेझीम पथकाचा खेळ लक्षवेधी ठरले.
सायंकाळी ६ वा. शिवछत्रपतींची मिरवणूक आमदार सचिन कल्याणशेट्टी, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, राजन जाधव, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, जि. प. सदस्य शिवराज म्हेत्रे, प्रवीण तानवडे, नगरसेवक तम्मा शेळके, प्रवीण शहा, देविदास कवटगी, दिलीप सिद्धे, मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, जिल्हाध्यक्ष नन्नु कोरबु, लाला राठोड यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांची विधिवत पूजन अप्पू पुजारी व सोमकांत कुलकर्णी यांच्या मंत्रपठण करून करण्यात आले. मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरील जुना राजवाडा समोरून श्रीमंत कमलाराजे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेनरोड मार्गे, फत्तेसिंह चौक ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
या मिरवणुकीस उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्वस्त चंद्रकांत भाऊ कापसे, हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, प्रथमेश इंगळे, मैनुद्दीन कोरबू, शिवराज स्वामी यांच्या उपस्थितीत प्रमुख मार्गावरून मिरवणूक संपन्न झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.