UPR26B07525
गोपाळपूर (ता. पंढरपूर) : येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनप्रसंगी मान्यवर.
.........
मातोश्री वृद्धाश्रमात शिवजयंती साजरी
........
पंढरपूर, ता. २२ : गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमामध्ये यंदाची शिवजयंती कौटुंबिक वातावरणात साजरी करण्यात आली. येथील लोकमान्य ग्रुपच्या वतीने वृद्धाश्रमातील वृद्ध माता-पित्यांसोबत हा उत्सव साजरा करत सामाजिक बांधिलकी जपली.
कार्यक्रमाची सुरवात प्रथमेश बनसोडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक श्री. शिंदे व श्रीमती चाटी यांचा प्रातिनिधिक स्वरूपात माऊली बोराटे यांच्या हस्ते शाल, पुष्प हार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. विश्वासराव मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्या विषयी माहिती सांगितली. प्रथमेश बनसोडे यांनी कवयित्री पद्मा गोळे यांची ‘महानतेचा मानदंड तू’ ही कविता सादर केली. शिवजयंतीच्या निमित्ताने आश्रमातील वृद्धांसाठी सकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमास इब्राहिम शेख, गणेश धोत्रे, दत्ता धोत्रे, वीर मोरे आणि वृद्धाश्रमाचे समन्वयक राक्षे उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत आणि आभार समन्वयक राक्षे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.