PGR26B03462
कासारवाडी (ता. बार्शी) : शिवजयंतीनिमित्त पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी यावेळी उपस्थित शिक्षक व शिक्षिका.
जिल्हा परिषद शाळा, कासारवाडी
पांगरी : कासारवाडी (ता. बार्शी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सरपंच अश्विनी मंडलिक, उपसरपंच सुधीर गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिद्धेश्वर जगताप, उपाध्यक्ष सुधीर माने यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षिका वीणा कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी आढावा घेतला. तसेच शिवनिती, गनिमी कावा आणि महाराजांच्या युद्धकौशल्याविषयी बाळासाहेब मुंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभयकुमार कसबे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुधाकर बडे, वीणा कदम, अभयकुमार कसबे, बिनादेवी दरेकर, बाळासाहेब मुंढे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.