PGR26B03460
पांगरी (ता. बार्शी) : बसस्थानक चौकातील शिवप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सवासमोर भजन सादर करताना सासुरे येथील वारकरी संप्रदायातील विद्यार्थी.
---
पांगरी व परिसर शिवमय
पांगरी : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पांगरीसह परिसरातील गावांमध्ये उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था, शाळा, तरुण मंडळे तसेच घरोघरी विविध कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली. दिवसभर परिसर ‘शिवमय’ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बसस्थानक चौक, श्रीराम पेठ, गोडसे गल्ली, बाजारपेठ आदी ठिकाणी भव्य स्टेज उभारून शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट आणि भगवे ध्वज यामुळे परिसर दिमाखदार दिसत होता. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या जयघोषांनी वातावरण दुमदुमले. बाजारपेठेतील तरुण मंडळाने पालखी मिरवणूक काढली. पारंपरिक वेशभूषेतील युवक, विद्यार्थी तसेच वारकरी संप्रदायाच्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर भजन सादर केले. दिवसभर शिवचरित्रावर आधारित गीते, व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.