पुणे

वालचंदनगरमध्ये विविध कार्यक्रम

CD

वालचंदनगर, ता. २० ः वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथे शिवजयंती उत्सव मंडळाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शिवजयंतीनिमित्त सोमवारी (ता. १६) इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नृत्य स्पर्धा झाल्या. लहान व मोठ्या गटामध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. बुधवारी (ता. १८) लहान मुलांसाठी शिवरुप सज्जा, वक्तृत्व व नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. गुरुवारी (ता. १९) सकाळी शिवज्योतीचे आगमन झाले. यावेळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. दुपारी शिवजन्म उत्सवाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला सारिका दत्तात्रेय भरणे यांच्यासह महिलांनी गर्दी केली होती. सायंकाळी शिवरायांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर बायडाबाई धोंडिबा गलांडे (रा. कळंब) यांना जिजाऊ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्ही. व्ही. राजन, विनायक बुधवंत, सरपंच अरुण वीर, कपिल गायकवाड, अप्पासाहेब क्षीरसागर उपस्थित होते. शिवजयंती यशस्वीपणे पार पडण्यासाठी शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष नितीन निकम, उपाध्यक्ष संतोष अवताडे, संदीप गायकवाड, रोहित पवार, विशाल सस्ते, हरीश व्यवहारे, सोमनाथ बल्लाळ, कार्याध्यक्ष अजिंक्य रणमोडे यांनी प्रयत्न केले.

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे (अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय) ः
नृत्य स्पर्धा लहान गट - श्रावणी सचिन खटकाळे, शिवांजली सचिन पवार, श्रीरंग वैभव नष्ठे व स्वरा फडतरे.
नृत्य स्पर्धा माेठा गट- स्वराज अनिल जाधव, मृणाली विजय महाडीक, भाग्यश्री मोरे.
वक्तृत्व स्पर्धा - जोया पठाण, श्रावणी सागर ठोंबरे, श्रावणी माणिक शेळके.
शिवरुप सज्जा स्पर्धा - सौम्यदिप गुणवरे, सार्थक अजित राजमाने, कार्तिकी नितीन निकम.
चित्रकला स्पर्धा लहान गट - अर्निका स्वप्निल कंदले, स्वराली सचिन वेदपाठक, काव्या विशाल दिक्षीत.
चित्रकला स्पर्धा मोठा गट - श्रेया प्रशांत महामुनी, काव्या प्रीतम जाधव, आर्यन विशाल बोंद्रे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधात फिर्याद, ८ जणांविरुद्ध गुन्हा!

Latest Marathi News Update: भंडाऱ्यात दुहेरी अपघात; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

SCROLL FOR NEXT