पुणे

मेडिकल दुकानात सारोळा येथे चोरी

CD

नसरापूर, ता. १८ : सारोळा (ता. भोर) येथील शिव मेडिकलचे शटर उचकटून चोरट्यांनी रोख रक्कम आणि संगणक असा एकूण सहा हजार १५० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आकांक्षा अमित साळुंखे (वय २५, रा. सावरदरे, ता. भोर) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. १२) रात्री ११ ते बुधवारी (ता. १३) सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम आणि संगणक चोरून नेला. सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार राहुल कोल्हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Mine Collapse : सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; ३० कामगारांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले

Pune Ring Road: पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा! रिंगरोडच्या पूर्व विस्ताराला मंजुरी; ३१.८ किमी मार्गावर ४ बोगदे, १८ उड्डाणपूल

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; सात जिल्ह्यांना येलो अलर्ट

Pune Crime: पुण्यातील पिंपळवंडीत चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; पोलिसांना चकवा देणाऱ्या शेजाऱ्याला बेड्या

Corporator Daughter: भाजप नगरसेविकेच्या २३ वर्षीय मुलीने संपवले आयुष्य, परीक्षेच्या आदल्या दिवशी उचलले टोकाचे पाऊल

SCROLL FOR NEXT