Shiv Sena corporators Development work better than others Shivajirao Adhalarao Patil sakal
पुणे

पुणे : शिवसेना नगरसेवकांची विकासकामे इतरांपेक्षा सरस; आढळराव

कृष्णकांत कोबल

हडपसर : शिवसैनिकांमध्ये समाजभान जपण्याची नैतिकता आहे. त्यामुळे महापालिकेच्या कोणत्याही प्रभागात शिवसेनेच्या नगरसेवकांची विकासकामे ही इतर नगरसेवकांच्या तुलनेत नेहमीच सरस होत असल्याचे दिसते, असे मत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.

नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी प्रभाग क्रमांक २६ महमंदवाडी येथील जय भवानी चौकाचे स्वखर्चाने सुशोभीकरण करून परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या सुविधेचे आढळराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देशमुख , नगरसेवक प्रमोद भानगिरे, नगरसेविका प्राची आल्हाट, शहर उपप्रमुख समीर तुपे, मतदार संघ अध्यक्ष राजेंद्र बाबर तसेच तानाजी लोणकर, बाळासाहेब भानगिरे, अभिमन्यू भानगिरे, सचिन तरवडे आदिंसह शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. नुकतीच बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या लढ्यातील आढळराव पाटील यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी यावेळी बैलगाडी सवारीही केली.

जय भवानी चौकालगत पूर्वी नागरिक कचरा टाकत होते. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. परिसरातील सोसायट्यांमधील नागरिक या घाणीमुळे त्रस्त झाले होते. नगरसेवक भानगिरे यांनी महापालिकेचया निधीची वाट न पहाता स्वखर्चाने चौकाचे सुशोभीकरण केले. तसेच परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Red Alert : पुणे जिल्ह्याला आज 'रेड अलर्ट'; पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Farm Loan Waiver : अजितदादांच्या जयंतीचा मुहूर्त! 56 लाख शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी; कर्जमुक्तीची पहिली यादी आज होणार प्रसिद्ध

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

CJP Protest : आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर; शरद  पवार, अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

SCROLL FOR NEXT