AKJ26B01675
संगम ः येथे ऊस फडात जाऊन ऊसतोड थांबविण्याचे आवाहन करताना शिवसेनेचे पदाधिकारी.
पाच हजारांच्या ऊसदरासाठी शिवसेनेचे गांधीगिरी आंदोलन
गुलाबपुष्प देत ऊसतोड थांबविण्याचे शेतकरी, कामगारांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
लवंग, ता. १९ : ऊस गाळप हंगाम सुरू झाला असताना साखर कारखान्यांकडून ऊसदर जाहीर करण्यापूर्वीच ऊसतोड सुरू करण्यात येत असल्याचा आरोप करत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने माळशिरस तालुक्यातील संगम येथे गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
संगम परिसरातील ऊसतोड सुरू असलेल्या शेतांमध्ये जाऊन शेतमालक आणि ऊसतोड कामगारांना गुलाबपुष्प देत, योग्य ऊसदर जाहीर होईपर्यंत ऊसतोड करू नये, असे आवाहन करण्यात आले.
बाजारात साखरेचे दर आणि मागणी वाढत असताना त्याचा पुरेसा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना का मिळत नाही, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. साखरेबरोबरच मळी, बगॅस आणि प्रेसमड या उपपदार्थांतून तसेच सहवीज निर्मिती आणि इथेनॉल उत्पादनातूनही साखर कारखान्यांना उत्पन्न मिळते. या उत्पन्नाचा आणि नफ्याचा योग्य लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात संगमचे माजी सरपंच रमेश इंगळे, ग्रामपंचायत सदस्य नरा इंगळे, आकाश पराडे पाटील, नवनाथ इंगळे, सचिन इंगळे, अक्षय भोई, विकास भोई, अमित भोई, अविनाश भोई, आदित्य इंगळे आदी सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.