ठाणे, ता. २७ : शिवसेना (यूबीटी) ठाणे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी शिवसेनेच्या माजी महापौर तथा नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांची विशेष तपास पथकाने मंगळवारी सुमारे सात तास चौकशी केली. दुपारी ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात दाखल झालेल्या मीनाक्षी यांना रात्री आठच्या सुमारास सोडण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांना प्रदीप पूर्णेकर यांच्याशी असलेले कथित वैमनस्य, हत्येच्या दिवशीचे त्यांचे ठिकाण आणि प्रकरणातील आरोपींशी असलेल्या परिचयाबाबत प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. चौकशीनंतर प्रसारमाध्यमांना मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, ‘‘पहिल्या दिवसापासून माझी भूमिका स्पष्ट आहे. पोलिस ज्या दिवशी चौकशीसाठी बोलावतील, त्या दिवशी मी हजर राहीन. पुन्हा बोलावले तरी चौकशीला येईन.’’
दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यांना रिक्षातून पोलिस ठाण्यात घेऊन जात असल्याचा आणि न्यायासाठी ते रडत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच संतापाचा उद्रेक झाला. दुपारी नौपाडा पोलिस ठाण्याबाहेर गर्दी जमा होऊ लागली. दुपारी दीड वाजता ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. रात्री ११ वाजेनंतरही हे आंदोलन सुरूच होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.