पुणे

पक्ष, चिन्हाबाबत सुनावणी आता १८ फेब्रुवारीला

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २३ : शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादाच्या खटल्याची अंतिम सुनावणी पुन्हा टळली असून सर्वोच्च न्यायालयाने यासाठी १८ फेब्रुवारीची तारीख दिली आहे. शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षनाव आणि घड्याळ चिन्हाची सुनावणी देखील लांबणीवर पडली आहे.
न्यायालयाने सुनावणीसाठी २१ जानेवारीची तारीख दिली होती. त्यानंतर शुक्रवारची तारीख दिली. आता थेट पुढील महिन्यातील तारीख देण्यात आली आहे. सर्व पक्षकारांना युक्तिवादासाठी पाच तासांचा वेळ दिला जाणार असल्याचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा व धनुष्यबाण चिन्ह या गटाकडे राहील, असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला होता. उद्धव ठाकरे यांच्या गटाने या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दीर्घ काळापासून हा खटला प्रलंबित आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वाढलेल्या ओबीसी आरक्षण मर्यादेच्या खटल्यावर २७ जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे. ज्या ५७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर गेली आहे, तेथील निवडणुकीचा निकाल न्यायालयीन निकालाच्या अधीन असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. ५७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ४० नगरपरिषदा आणि १७ नगर पंचायतींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dams Water Level : पुणेकरांसाठी मोठी बातमी! चारही धरणे 100% भरली; पण आज 'या' भागात पाणीच नाही

Farmer Accident Scheme: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अपघात सुरक्षा योजनेत आता संपूर्ण कुटुंबाला संरक्षण, 2031 पर्यंत मुदतवाढ

Mumbai Local Train Viral Video : माथेफिरुने रोखली लोकल ट्रेन, धाडसी प्रवाशामुळे टळली मोठी दुर्घटना; रुळांवरचा थरार कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Gold Rate Today: RBI च्या निर्णयानंतर ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा सोन्याच्या भावात मोठा बदल! आज 10 ग्रॅमचा ताजा भाव किती?

Kolhapur Flood: हिप्परगी, आलमट्टीत पाणी साठ्याचे निकष धाब्यावर; ‘आंदोलन अंकुश’च्या पाहणीत स्पष्ट, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महापुराचे संकट

SCROLL FOR NEXT