पुणे

भगवा फडकविण्यासाठी सज्जा व्हा : संजय राऊत

CD

शिक्रापूर, ता. १२ : ‘‘आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, तसेच पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी जोरदार तयारीला लागा. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवा. पक्षसंघटनेत कार्यतत्परतेने काम करणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांना संधी द्या. शिवसेना आजही तळागाळापर्यंत भक्कम असून, हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे. शिरूर तालुक्यात भगवा फडकवण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी सज्ज व्हा,’’ असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी शिरूरच्या शिवसैनिकांना केले.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा आढावा बैठक झाली. त्यावेळी राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत शिवसैनिकांना आगामी राजकीय वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘आमचा आयता तयार जिल्हाप्रमुख माउला कटके तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत नेऊन शिरूर-हवेलीचा आमदार केला. आता यापुढे आम्ही असे होऊ देणार नाही. शिरूरची लोकसभा तुमच्याकडे घ्या आणि शिरूरचा आमदार आम्हाला आमचा करायचा आहे. त्यामुळे तो आमचाच होईल, हे आजच सांगून जातोय.’’
या वेळी पुणे संपर्कप्रमुख सचिन पडवळ, शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख किरण तावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास धनवटे, सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, विधानसभा संपर्कप्रमुख मनोज ईसवे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र तांबे, उपजिल्हाप्रमुख कैलास भोसले, अनिल वढघुले, उपजिल्हाप्रमुख मच्छिंद्र गदादे, तालुकाप्रमुख पोपट शेलार, शहरप्रमुख संजय देशमुख, किरण देशमुख, मंगेश खांडरे, शिवसेना उपतालुकाप्रमुख अनिल पवार, शेतकरी सेना तालुकाप्रमुख योगेश पाटील, तालुका सल्लागार संतोष काळे, संदीप शिदे, शरद बांदल, उपतालुकाप्रमुख संतोष भोंडवे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT