shiv sena Vijay shivtare join rebel shivsena mla eknath shinde amide maharashtra political crisis  
पुणे

पुण्यात शिवसेनेला खिंडार! माजी मंत्री विजय शिवतारे शिंदे गटात जाणार

सकाळ डिजिटल टीम

पुणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री विजय शिवतारे एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तालुक्यातील कामे होत नाहीत, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती तोडावी अशी भूमिका आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केली, विजय शिवतारेच्यां भूमिकेमुळे शिवसेनेला पुणे जिल्ह्यात मोठ खिंडार पडणार आहे. (shiv sena Vijay shivtare join rebel shivsena mla eknath shinde amide maharashtra political crisis)

एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली आहे ती संघटनेसाठी आहे, आम्ही एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जाणं क्रम प्राप्त आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस बरोबर जाऊ नका अशी विनंती एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर असलेल्या सर्व जणांनी उद्धव ठाकरेंना केली होती पण दुर्दैवाने एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला दाद मिळाली नाही. आढळराव सारखा लोकांची मतं असणारा माणूस त्यांनी विनंती केली की आम्हाला जगू द्या पण ती दाबली जात होती, हे आम्ही लेखी पत्रातून देखील दिलं पण संरक्षण दिले गेलं नाही असेही त्यांनी सांगितलं.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे सज्जन आहेत पण त्यांना घेरले आहे, उद्धव ठाकरेंना आम्ही पत्र देतोय की आम्ही त्यात आमच्या व्यथा मांडल्या जिथे आमचे कामं झाले नाहीत. आम्ही बाळासाहेबांचेच शिवसैनिक आहोत, मात्र आम्ही महविकास आघाडी बरोबर नाहीत. ५१ आमदारांनी सांगितल्या नंतर महाराष्ट्रातील लोकांना समजत नाहीय की काय होणार, आमचं म्हणणं एकच आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडा, असे विजय शिवतारे यांनी यावेळी सांगितलं.

ही वेळ संजय राऊत यांच्यामुळे आली..

आमदार सुरतला गेल्यानंतर मी व्हॉट्सॲप वरुन मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांना पत्र दिलं होतं पण मला रिस्पॉन्स आला नाही. मी कोविड पॉझिटीव्ह आलो होतो म्हणून मी आज तुमच्या समोर आलो, ५१ आमदार यांच्यावर कारवाई झाली तर ५२ वा मी असेल, असे देखील शिवतारे यावेळी म्हणालेत, यादरम्यान त्यांनी शिवसेनेत झालेल्या बंडावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ठपका ठेवला. ते म्हणाले की, ही आज जी वेळ आली आहे ती संजय राऊत यांच्यामुळे आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT