पुणे

शिव-शंभू कॉरिडॉरसाठी ३९० कोटींचा प्रस्ताव

CD

राजगुरुनगर, ता. १४ : शिरूर लोकसभा मतदारसंघातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रस्तावित ‘शिव-शंभू कॉरिडॉर’च्या ३९० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला सार्वजनिक बांधकाम विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. प्रकल्प विभागाने तयार केलेला हा प्रस्ताव आता राज्य शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे गेल्या चार वर्षांपासून शिवनेरी किल्ला ते वढू बुद्रुक दरम्यानच्या या ६० किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरसाठी पाठपुरावा करत होते. या मागणीची दखल घेत पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार १० मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्याची योजना आखली आहे.
या कॉरिडॉरमुळे जुशिवनेरीसह जुन्नर तालुक्यातील किल्ले व पर्यटन स्थळे, ओझर, लेण्याद्री येथील अष्टविनायक गणपती मंदिरे, लेणी समूह, त्याचबरोबर वाफगावचा ऐतिहासिक होळकरवाडा, पेशवेकालीन टांकसाळ, कनेरसरचे यमाई देवस्थान आणि वढू-तुळापूरचे छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळजोडली जाणार आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना पर्यटन मार्गदर्शक, निवास व्यवस्था आणि हॉटेल व्यवसायाद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT