woman officer Shiva Chauhan sakal
पुणे

Shiva Chauhan : जगातील सर्वात उंच युद्ध क्षेत्रात प्रथमच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती

भारतीय सैन्यदलाच्या इतिहासात प्रथमच एका महिला अधिकाऱ्याची नियुक्ती ‘ऑपरेशनल’ कार्यासाठी सियाचीनच्‍या १५ हजार ६३२ फूट उंच ठिकाणी असलेल्या ‘कुमार पोस्ट’ येथे करण्यात आली आहे.

अक्षता पवार

भारतीय सैन्यदलाच्या इतिहासात प्रथमच एका महिला अधिकाऱ्याची नियुक्ती ‘ऑपरेशनल’ कार्यासाठी सियाचीनच्‍या १५ हजार ६३२ फूट उंच ठिकाणी असलेल्या ‘कुमार पोस्ट’ येथे करण्यात आली आहे.

पुणे - ‘ती’ने आतापर्यंत विमान चालविले... तिने प्रत्यक्षात युद्धभूमीवर जाऊन कर्तव्यही बजावले... आता तर तिने धाडसाचे शिखर गाठत थेट जगातील सर्वात उंच अशा युद्धभूमीला गवसणी घालत पुन्हा एकदा कर्तबगारी सिद्ध केली आहे. ही देदीप्यमान कामगिरी बजावली आहे कॅप्टन शिवा चौहान हिने. भारतीय सैन्यदलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम तिने केले आहे.

भारतीय सैन्यदलाच्या इतिहासात प्रथमच एका महिला अधिकाऱ्याची नियुक्ती ‘ऑपरेशनल’ कार्यासाठी सियाचीनच्‍या १५ हजार ६३२ फूट उंच ठिकाणी असलेल्या ‘कुमार पोस्ट’ येथे करण्यात आली आहे. त्यामुळे महिला प्रत्येक क्षेत्रात उंची गाठत असल्याचे यातून सिद्ध होत आहे. कारगिल-लेह येथील लष्करी तैनाती आणि सियाचिन बर्फाळ प्रदेशाचे रक्षण करणाऱ्या ‘फायर अँड फ्युरी कोअर’ने मंगळवारी (ता. ३) कोअर ऑफ इंजिनियर्समधील कॅप्टन चौहान हिला कुमार पोस्ट येथे तैनात केल्याचे जाहीर केले. यासाठी कॅप्टन चौहानने कठीण प्रशिक्षण पूर्ण केले. सियाचिन ग्लेशियरवर असलेल्या या प्रत्यक्ष पोस्टवर लष्करी महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आजवर महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या नियमित सेवाकार्याचा भाग म्हणून सियाचिन बेस कॅम्पवर तैनात करण्यात येत होते. जे सुमारे नऊ हजार फुटांवर आहे.

भारतीय नौदल आणि हवाईदलाने त्यांच्या सेवेत महिलांसाठी इतर सर्व शाखांसह लढाऊ शाखा ही खुली केले असली तरी, सैन्यदलाद्वारे त्यांच्या लढाऊ शाखेत अर्थात पायदळात महिला अधिकाऱ्यांचा अद्याप समावेश झालेला नाही.

कॅप्टन शिवा चौहान मूळची राजस्थानची असून बंगाल सॅपरची अधिकारी आहे. कॅप्टन चौहानचे शालेय शिक्षण उदयपूर येथून झाले असून तीने स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली आहे. २०२१ मध्ये कॅप्टन चौहान सैन्यदलाच्या इंजिनिअर रेजिमेंटमध्ये अधिकारी म्हणून नियुक्त झाली. सियाचिनमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कॅप्टन चौहान देशसेवा बजावणार आहे. कुमार पोस्ट हे ‘नॉर्दर्न ग्लेशियर बटालियन’चे मुख्यालय असून येथे तैनात असलेल्या या महिला अधिकाऱ्यासाठी शौचालय, राहण्यासाठीची सुविधा स्वतंत्रपणे देण्यात येणार आहे.

जाणून घ्या कुमार पोस्ट बाबत -

- अत्यंत बर्फाळ प्रदेश असलेल्या सियाचिन येथे आहे कुमार पोस्ट

- कुमार पोस्टच्या मार्गावर चार कॅम्प

- जगातील सर्वात उंच युद्धभूमी

- येथे नेहमी उणे तापमान, ऑक्सिजन ही कमी असते

- २०१९ मध्ये येथे पर्यटनाला सुरवात झाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री थोडक्यात बचावले, उड्डाण घेताच मागे जाऊ लागलं हेलिकॉप्टर, मोठी दुर्घटना टळली!

IND vs AUS, 1st T20I: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची दणक्यात सुरुवात; पावसाने खोडा घातला, पण सिडनीत विजय मिळवला

Pune: महाशिवरात्री उत्साहाला गालबोट! हरिश्चंद्र गडावर दुर्दैवी घटना, दर्शनाहून परतताना भाविकावर काळाचा घाला

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्माचं कमबॅक होणार, कुलदीप यादवही खेळणार! भारताची पाकिस्तानविरुद्ध कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

Shashikant Shinde: विलीनीकरण चर्चेस आता पूर्णविराम, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT