AKK26B05884
हालहळ्ळी (अ.) (ता. अक्कलकोट) : येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना ग्रंथभेट देत शिवजयंती साजरी करण्यात आली.
....
अक्कलकोटमध्ये ग्रंथभेटीतून शिवजयंतीचा संदेश
हालहळ्ळीतील सावरकर सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम
.......
अक्कलकोट, ता. २० : हालहळ्ळी (अ) (ता. अक्कलकोट) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ गोविंदे यांच्या कल्पकतेतून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विद्यार्थ्यांना ग्रंथभेट देत उत्साहात साजरी करण्यात आली. देशभक्ती, वाचनसंस्कृती अन् इतिहासाची जाणीव या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामसेविका सरवळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश बिराजदार होते. यावेळी पोलिस पाटील, मल्लिकार्जुन बिराजदार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन केले. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत निरंतर वाचन केंद्रातील शालेय विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथभेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकावर आपल्या बोलीभाषेत अभिप्राय लिहून तो मराठी भाषा गौरव दिनी २७ फेब्रुवारीपर्यंत शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सादर करावा असे आवाहन करण्यात आले.
यावेळी नदाफ शेख व विद्यार्थी उपस्थित होते. शेख यांनी शिवरायांच्या पराक्रमाची व स्वराज्य स्थापनेची माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमान जागवला. कार्यक्रमाच्या शेवटी यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.