चास, ता. २३ ः ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या डोळ्यापुढे ठेवून प्रत्येकाने वाटचाल केली पाहिजे,’’ असा कानमंत्र जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
डेहणे (ता. खेड) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत आयोजित कार्यक्रमात सुपे बोलत होते.
येथील हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिवजयंतीच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाविद्यालयात डॉ. शकील जाफरी यांच्या सहकार्यातून शिवकाल व इतर कालखंडातील ऐतिहासिक नाणी, नोटा व विविध देशांचे टपाल तिकिटे यांचे भव्य प्रदर्शन भरविले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषद सदस्य समीर काळुराम सुपे यांच्या हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. किशोर भागवत होते. जिल्हा परिषद शाळा खरोशी, शिवाजी विद्यालय डेहणे, जिल्हा परिषद शाळा वांजळे येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रदर्शनास भेट देऊन माहिती घेतली. उद्घाटनानंतर डॉ. शकील जाफरी यांचे शिवव्याख्यान आयोजित केले होते. यावेळी पद्मजा वाळूज, प्रियांका बांगर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी आदिवासी मुलीच्या वसतिगृहाच्या अधीक्षक श्रुती जगदाळे, केंद्रप्रमुख अनिल बोऱ्हाडे, दत्तात्रेय वाळूंज, राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष राहुल जठार, उद्योजक अमर सांडभोर, संपत कोरडे, शुभम उबाळे, सारिका ओव्हाळ, उपप्राचार्य सिलदार पावरा उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. महेश रानवडे यांनी केले, सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी लांघी हिने, तर ऋतुजा कौंदरे हिने आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.