हिवरवाडी परिसरात
शिवजयंती उत्साहात
मायणी : हिवरवाडी (ता. खटाव) येथे राजमुद्रा तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. मंडळामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. बालचमूंनी नाटक सादरीकरण केले. त्यानंतर महिलांचे पारंपरिक खेळ आणि खेळ पैठणीचा कार्यक्रम झाला. मंडळाने आणलेल्या शिवज्योतीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात प्रतिमेची गावातून भव्य, दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी शिवकालीन वेशभूषेत सजलेल्या युवक-युवतींचा सहभाग लक्षवेधी ठरला. शिवचरित्रावर आधारित घोषवाक्ये व फलकांमुळे वातावरण शिवमय झाले होते. गावातील नागरिक, महिला व बालकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंडळामार्फत गावकऱ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.
.....................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.