पुणे

वाई:-वसंत व्याख्यानमाला वृत्त. अतिरिक्त महसूल सचिव विकास खारगे.

CD

शिवरायांच्या नीतिमूल्यांची करा जपणूक

विकास खारगे; वाईतील व्याख्यानमालेत मुलाखत

वाई, ता. १३ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील १२ गड किल्ल्यांना युनेस्कोचे मानांकन मिळाल्याने त्यांची जागतिक वारसा स्थळ अशी नोंद झाली आहे. या गड-किल्ल्याच्या संरक्षणाबरोबरच छत्रपतींच्या नीतिमूल्यांची जपवणूक करण्याची सर्वांची जबाबदारी वाढली आहे, असे प्रतिपादन महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी येथे केले.
लोकमान्य टिळक स्मारक संस्था संचलित वसंत व्याख्यानमालेत श्री. खारगे यांची ‘युनेस्कोचा गड सर करताना’ या विषयावर डॉ. रूपाली अभ्यंकर यांनी मुलाखत घेतली. यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून श्री. खारगे यांच्या जीवनकार्याचा प्रवास उलगडला.

श्री. खारगे म्हणाले, ‘‘सक्सेस युनिव्हर्सिटी (यूके) व हावर्डमध्ये उच्च शिक्षण कोर्स पूर्ण केले. सांस्कृतिक विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता. यावेळी छत्रपतींची वाघनखं ही लंडनमधून आणण्यात यश मिळाले. त्यानंतर युनेस्कोसाठी काम करण्याची संधी मिळाली.’’

छत्रपतींच्या गड-किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद करण्यासाठी युनोस्कोच्या निकषांत प्रस्ताव सादर केला. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून आवश्यक सर्व पुरावे सादर केले.’’ त्यानंतर छत्रपती शिवरायांचे गड-किल्ले जागतिक स्तरावर पोहोचले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
अजित क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. विद्या साळी यांनी परिचय करून दिला. डॉ. चिंतामणी केळकर यांनी सत्कार केला. प्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मेटकरी, नायब तहसीलदार अतुल मर्ढेकर, भाऊसाहेब जगदाळे आदी उपस्थित होते.
----------------------------

07885
वाई : विकास खारगे यांची मुलाखत घेताना डॉ. रूपाली अभ्यंकर.
--------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Petrol-Diesel Rate: RBI गव्हर्नरांच्या इशाऱ्यानंतर नवे दर जाहीर; पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT