पुणे

शिवाजी महाराज देव नव्हे, देवमाणूस होते – प्रा. डॉ. सतीश कदम (उपळाई बुद्रुक येथे शिवजयंती निमित्त व्याख्यान संपन्न)

CD

UPB26B03841
डॉ. सतीश कदम

शिवरायांचे विचार आचरणात आणा ः प्रा.डॉ. कदम

उपळाई बुद्रूक, ता. २४ ः छत्रपती शिवाजी महाराज यांना देवत्व देण्यापेक्षा त्यांच्या मानवी कर्तृत्वाचा, दूरदृष्टीचा आणि संघर्षाचा अभ्यास करणे अधिक महत्त्वाचे आहे. दैवतीकरणामुळे त्यांच्या पराक्रमामागील नियोजन, शिस्त आणि प्रशासनकौशल्य झाकोळले जाते, असे ठाम प्रतिपादन महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश कदम यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपळाई बुद्रूक येथे मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा सखोल आढावा घेतला. महाराज देव नव्हते, तर देवमाणूस होते. त्यांच्या आरत्या, दैवतीकरण आणि अंधश्रद्धात्मक गौरवामुळे पुढील पिढीला असे वाटू शकते की ते देव असल्यामुळेच पराक्रम करू शकले. मात्र त्यांच्या यशामागे कठोर परिश्रम, अभ्यासू वृत्ती, अचूक नियोजन आणि लोकाभिमुख प्रशासन होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. डॉ. कदम यांनी स्वराज्य संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, शिवाजी महाराजांनी तत्कालीन अस्थिर राजकीय परिस्थितीत सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेला आणि सन्मानाला प्राधान्य दिले. त्यांनी शिस्तबद्ध आणि कार्यक्षम सैन्य उभारले, किल्ल्यांची साखळी निर्माण केली, आरमारी शक्ती वाढवली आणि न्यायनिष्ठ शासनपद्धती राबवली. त्यांच्या प्रशासनात पारदर्शकता, जबाबदारी आणि जनकल्याण यांना केंद्रस्थानी स्थान होते.
यावेळी त्यांनी युवकांना आवाहन केले की, केवळ उत्सव साजरे करून थांबू नका; इतिहास समजून घ्या, अभ्यास करा आणि त्यातून प्रेरणा घ्या. शिवजयंती ही केवळ एक परंपरा नसून ती विचारांची जागृती आहे, कार्यक्रमास ग्रामस्थ, युवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT