पुणे

वडगावमध्ये शुक्रवारी विविध दाखल्यांचे वितरण

CD

वडगाव मावळ, ता. १४ : मावळ तहसील कार्यालय व वडगाव नगरपंचायतीच्या वतीने शुक्रवारी (ता. १५) वडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार विक्रम देशमुख, वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अबोली ढोरे व मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.
महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे, जनतेच्या तक्रारी त्वरित निकाली काढणे, महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी प्रत्येक तालुक्यांमध्ये मंडळ स्तरावर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मावळ महसूल विभागाच्या वतीने वडगाव येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात शुक्रवारी (ता. १५) सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शिबिरस्थळी ही सुविधा मिळणार
जन्म-मृत्यू-विवाह नोंदणी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, झोन दाखला, वडगाव मालमत्ता कर उतारा व थकबाकी नसल्याचा दाखला तसेच प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील नावातील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पत्र, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (एन ए) परवानगी, अकृषिक (एन ए) तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार ‘सनद’ प्रक्रियेची माहिती सामाजिक अर्थसाहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, ॲग्री स्टॅक आणि पी. एम. किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी ‘कमी-जास्त पत्रके’ तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे, रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्डबाबत कामकाज केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: २-० ने मालिका जिंकली अन् आता टीम इंडियात होणार मोठा फेरबदल? तिसऱ्या वनडेत ‘या’ स्टार्सची एन्ट्री, कोण होणार OUT?

Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी महिनाभर बंद; नित्यपूजा मात्र सुरू राहणार

SCROLL FOR NEXT