पुणे

नगर ःसंगमनेरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक होण्याचे अडथळे झाले दुर

CD

संगमनेरला शिवरायांचे
भव्य स्मारक होणार

ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : संगमनेर शहराच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रयत्नांना यश आले आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे एसटी महामंडळ आणि संगमनेर नगरपालिका यांच्यात जागा हस्तांतराचा करार नुकताच करण्यात आला. एसटी महामंडळाने स्मारकासाठी निश्चित केलेली जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित केली आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

संगमनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी २०१८ साली तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या कार्यकाळात संगमनेर नगरपालिकेने ठराव केला होता. २०२३ मध्ये आमदार सत्यजीत तांबे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व परिवहनमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संगमनेर बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत सहा मीटर बाय चार मीटर जागा स्मारकासाठी देण्यास मान्यता देण्यात आली. स्मारकाच्या परिसरात गार्डन आदी सुविधा विकसित करण्यासही परवानगी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT