पुणे

छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळा

CD

PNE26W50380
(गोविंदगिरी)
---------------
छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळा

श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट उपक्रम

अहिल्यानगर, ता. १६ ः येथील श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे महासचिव स्वामी गोविंददेव गिरी हे २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत चरित्र कथा सांगणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष नंदलाल मणियार यांनी दिली.

शहरातील नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्समध्ये मंगळवारी (२९) दुपारी ३ वाजता या सोहळ्याचा प्रारंभ केला जाईल. दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत कथा सोहळा सांगणार आहेत. पहिल्या दिवशी शिवजन्म पूर्व काळ, तत्कालीन परिस्थिती, शिवजन्म ते स्वराज्याची शपथ, संतकार्य. दुसऱ्या दिवशी कान्होजी जेधे, जावळीचा वेढा, प्रतापगड युद्धनिती, अफझलखान वध. १ ऑक्टोबरला पावनखिंडीतील शौर्य, चाकणचा रणसंग्राम, लाल महालावर स्वारी (शाहिस्तेखानावर मात), प्रथम आरमार स्वारी, पुरंदरचा वेढा व तह. २ ऑक्टोबरला आग्रा येथून सुटका, छत्रसाल बुंदेला यांना प्रेरणा, सिंहगड अर्थात तानाजी मालुसरे शौर्यगाथा. ३ ऑक्टोबरला सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत सांगता होणार आहे. या सांगता सोहळ्यात महाराजांचे विजय पर्व, शिवराज्याभिषेक, स्वराज्याची स्थापना यांचा समावेश राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याचे यजमानपद सुमित वर्मा भूषविणार आहेत. वैदिक पद्धतीने होणारा शिवराज्याभिषेक सोहळा या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण राहणार आहे.
या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष नंदनवन उद्योग समूहाचे संजय जाधव हे आहेत. मंचचे प्रायोजकत्व शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनकडे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

Prataprao Pawar : कृषी, शिक्षणातील समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

Harry Brook Record: इंग्लंडच्या कर्णधार हॅरी ब्रूकने रचला इतिहास, T20 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधार रोहित शर्मालाही हे जमलं नाही

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT