शिवरायांचे विचार आचारणात आणण्याची गरज
प्रदीप सोळुंके; लोणंदमध्ये नगरपंचायतीच्या पटांगणावर व्याख्यान
लोणंद, ता. २१ : छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले, बोटे तोडली, पोट फाडले म्हणून आपण त्यांना मानत नाही, तर राजे स्वतःच्या साम्राज्यासाठी नव्हे, तर रयतेच्या राज्यासाठी लढले. म्हणून आज त्यांची सर्वत्र जयंती साजरी होते. अन्य कितीतरी शूर राजे झाले मात्र त्यांची जयंती साजरी होत नाही. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचीच जयंती साजरी केली जाते. गुलाल, भगवा रंग उधळून अथवा ध्वनियंत्रणा लावून वेडेवाकडे नाचून जयंती साजरी करण्याने छत्रपती कधीच समजणार नाहीत. यासाठी छत्रपतींनी दिलेल्या विचार आचारातून प्रेरणा घेऊन पुढे गेले पाहिजे, असे प्रतिपादन व्याख्याते प्रदीप सोळुंके यांनी केले.
लोणंद मराठा समाज मंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त येथील नगरपंचायतीच्या पटांगणावर आयोजित सार्वजनिक शिवजयंती सोहळ्यात ‘शिवचरित्र शोध आणि बोध’ या विषयावरील व्याख्यान दरम्यान ते बोलत होते. नगराध्यक्षा मधुमती गालिंदे या अध्यक्षस्थानी होत्या, तर लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके, नगरसेवक शिवाजीराव शेळके, सचिन शेळके, तृप्ती घाडगे, डॉ. नितीन सावंत, अॅड. सुभाषराव घाडगे, के. के. गायकवाड, अॅड. सर्फराज बागवान, संदीप शेळके, हर्षवर्धन शेळके, मराठा मंडळाचे अध्यक्ष विजय कुतवळ, उपाध्यक्ष मयूर निंबाळकर, मयूरराज गायकवाड आदी प्रमुख उपस्थित होते.
मराठा मंडळाचे माजी अध्यक्ष अविनाश नलवडे व नाभिक संघटनेचे माजी अध्यक्ष किशोर (बबलू) पवार यांचा विशेष कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष विजय कुतवळ यांनी प्रास्ताविक केले, सदानंद मोरे यांनी स्वागत, तर सुनील यादव व रोहित निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले, तर मयूरराज गायकवाड यांनी परिचय करून दिला. भूषण भोईटे यांनी आभार मानले.
0435७
लोणंद ः येथे शिवप्रतिमचे पूजन करताना प्रदीप सोळुंके, मधुमती गालिंदे, शिवाजी जायपत्रे, विजय कुतवळ, मयूर निंबाळकर आदी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.