पुणे

पुणे :..म्हणून पीएमपीच्या 2.40 लाख प्रवाशांचे झाले हाल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक वर्दळीच्या शिवाजी आणि बाजीराव रस्ता नववर्षाच्या दिवशी बुधवारी वाहतुकीसाठी अचानक बंद केला. त्यामुळे पीएमपीच्या चार हजार फेऱ्या रद्द झाल्याने सुमारे दोन लाख 40 हजार प्रवाशांची गैरसोय झाली, तर पीएमपीचे उत्पन्नही 40 लाखांनी घटले. 

नववर्षाच्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या गणपती दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी शिवाजी रस्त्यावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जवळच्या रस्त्यांवर मोठी कोंडी झाली. परिणामी, बुधवारी सायंकाळपासून बाजीराव रस्त्यावरीलही वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद केली. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होण्याबरोबरच पीएमपीच्या वाहतुकीलाही मोठा फटका बसला. पोलिसांच्या निर्णयामुळे ज्येष्ठ, महिला, विद्यार्थ्यांना त्रास झाला. सायंकाळपासून घरी परतणाऱ्या प्रवाशांना महात्मा फुले मंडईपासून स्वारगेटपर्यंत चालत जावे लागले. मंडईतून एरवी रिक्षाचालक दहा रुपये प्रतिसीट घेतात, परंतु बस बंद झाल्यामुळे त्यांनी भाडे दुप्पट केले. 

शिवाजी रस्त्यावरून पीएमपीचे स्वारगेट, कात्रज, धनकवडी, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, भिलारवाडी, आंबेगाव आदी परिसरातील सुमारे 60 मार्गावर बस आहेत. त्यावरून रोज सुमारे 200 बस धावतात. सुमारे 1 लाख 20 हजार जण प्रवास करतात. बाजीराव रस्त्यावरूनही तेवढ्याच प्रवाशांची वाहतूक होते. या दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक अचानक बंद केल्यामुळे प्रवाशांना घरी परतताना त्रास झाला. 

पीएमपीच्या वाहतुकीत शिवाजी आणि बाजीराव हे महत्त्वाचे रस्ते आहेत. तेथील वाहतूक शक्‍यतो बंद करू नये, अशी विनंती पीएमपीने अनेकदा पोलिसांना केली. पीएमपीचे उत्पन्न घटण्यापेक्षा प्रवाशांची होणारी गैरसोय, आमच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. कारण, त्यात पासधारकांचाही समावेश असतो. विशेषतः विद्यार्थी आणि ज्येष्ठांची गैरसोय होते. 

- अनंत वाघमारे, महाव्यवस्थापक, पीएमपी वाहतूक विभाग 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोशल मीडियाचा निष्पक्ष न्यायप्रक्रियेला धोका; सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण; व्यक्त केली गंभीर चिंता, काय म्हणाले?

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Pune Crime: चाेरट्यांचा तब्बल २८ तोळे सोन्यावर डल्ला; आंबेगाव तालुक्यातील घटना, घरात काेणी नसल्याने साधला डाव!

Ayurvedic Tips for Oral Health: आयुर्वेदात सांगितलेल्या या सवयी फक्त दाताचं आरोग्यच नाही, तर पचनही परफेक्ट करतात; आजच फॉलो करा

Satara ZP: कायद्याचे रक्षक की सत्तेचे साधक! सातारा झेडपी अध्‍यक्ष निवडीवेळी झालेल्‍या ‘पाॅवर प्‍ले’चे पडसाद; पोलिसांच्या भूमिकेवर संशय..

SCROLL FOR NEXT