शिवाजीनगर ः मॉडर्न बॅडमिंटन संकुलात सुरू असलेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात पुण्याची शरयू रांजणे शटल परतविताना.
--------------
विहान, हृदान, रुद्रनिराजे, कायरा, आराध्याची प्रतिस्पर्ध्यांवर मात
राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा ः शरयू, चिन्मय, तनिष्क, यशवीचे विजय
पुणे, ता. ७ ः सुधांशु बॅडमिंटन अकादमी आयोजित एसबीए करंडक पंधरा व सतरा वर्षांखालील गटाच्या राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या विहान कोल्हाडे, हृदान पाडवे, रुद्रनिराजे निंबाळकर, कायरा रैना, आराध्या ढेरे, शरयू रांजणे, चिन्मय फणसे, तनिष्क आडे, यशवी पटेलने नागपूरचा आदित्य यउलने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
शिवाजीनगर येथील मॉडर्न बॅडमिंटन संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत सतरा वर्षांखालील मुलांच्या गटात चिन्मय फणसेने मुंबई उपनगरच्या सत्य चौहानला १५-११, १८-१६ असे, एल. अभिग्यान सिंघाने उदयन देशमुखला १०-१५, १५-५, १५-५ असे, तनिष्क आडेने ठाण्याच्या विश्वजित थविलला १३-१५, १८-१६, १५-१२ असे तर नागपूरच्या आदित्य यउलने पुण्याच्या अनय एकबोटेला १५-८, १५-५ असे हरविले होते.
मुलींच्या गटात अनुष्का इप्तेने रुद्रनिराजे निंबाळकरवर १५-९, १५-११ असा, यशवी पटेलने सान्वी घाटेवर १५-७, १७-१५ असा शरयू रांजणेने पुण्याच्याच समन्वया धनंजयवर १५-३, १५-८ असा तर कायरा रैनाने शर्वरी सुरवसेवर १५-८, १५-९ असा विजय मिळविला होता.
निकाल :
उपांत्यपूर्व फेरी ः पंधरा वर्षाखालील मुले : आदित्य यउल (नागपूर) वि.वि. रुहान भाटिया (मुंबई शहर) १५-१०, १५-८; विहान कोल्हाडे (पुणे) वि.वि. हिमांशू भाटकर (रायगड) १५-७, १५-७; हृदान पाडवे (पुणे) वि.वि. शारव जाधव (पुणे) १५-१, १५-५, प्रग्नय शिंदे (रायगड) वि.वि. सिब्तैनराझा सोमजी (पुणे) १५-३, १५-८. मुली : रुद्रनिराजे निंबाळकर (पुणे) वि.वि. सान्वी घाटे (नागपूर) १८-१६, १२-१५, १५-३; ख्याती कत्रे (पुणे) वि.वि. अन्विषा घोरपडे (मुंबई शहर) १५-६, १५-१३, कायरा रैना (पुणे) वि.वि. स्वरा मोरे (पुणे) १५-१२, १५-१२; आराध्या ढेरे (पुणे) वि.वि. समन्वया धनंजय (पुणे) ९-१५, १५-१२, १५-१२.
सतरा वर्षांखालील मुले : चिन्मय फणसे (पुणे) वि.वि. सत्य चौहान (मुंबई उपनगर) १५-११, १८-१६; एल. अभिग्यान सिंघा (पुणे) वि.वि. उदयन देशमुख (छत्रपती संभाजीनगर) १०-१५, १५-५, १५-५; तनिष्क आडे (पुणे) वि.वि. विश्वजित थविल (ठाणे) १३-१५, १८-१६, १५-१२; आदित्य यउल (नागपूर) वि.वि. अनय एकबोटे (पुणे) १५-८, १५-५. मुली : अनुष्का इप्ते (रायगड) वि.वि. रुद्रनिराजे निंबाळकर (पुणे) १५-९, १५-११; यशवी पटेल (पुणे) वि.वि. सान्वी घाटे (नागपूर) १५-७, १७-१५, शरयू रांजणे (पुणे) वि.वि. समन्वया धनंजय (पुणे) १५-३, १५-८; कायरा रैना (पुणे) वि.वि. शर्वरी सुरवसे (पुणे १५-८, १५-९;
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.