Rutik Marne
Rutik Marne sakal
पुणे

Shivajinagar News : दर्जेदार साहित्य नसल्याने सरावात अडचणी; ऑलिम्पिक जिंकण्याची जिद्द बाळगणाऱ्या खेळाडूची खंत

समाधान काटे

शिवाजीनगर - सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा ऋतिक मारणे ११ वर्षापासून राजे शिवाजी क्लायबिंग भिंत (वॉल) शिवाजीनगर गावठाणात क्लायबिंग खेळाचा सराव करत आहे. त्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धात सहभाग घेत अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. देशासाठी ऑलिम्पिक जिंकण्याची जिद्द मनात बाळगून तो सराव करत आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाचे साहित्य उपलब्ध नसल्याने दर्जात्मक सराव करता येत नसल्याची त्याची खंत आहे.

'ऋतिक म्हणाला, '२०१२ साली कबड्डीचा सराव करत असताना क्लायबिंग खेळाची माहिती मिळाली आणि सराव सुरू केला. प्रथम पश्चिम विभागीय स्पर्धा खेळत सुवर्णपदक पटकावले. तिथून माझ्या स्पर्धेचा प्रवास सुरु झाला.

२०१५ मध्ये मिळालेल्या पहिल्या राष्ट्रीय पदकामुळे माझा आत्मविश्वास दुणावला. पुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या दृष्टीने तयारी चालू केली. २०१७ मध्ये एशियन युथ स्पोर्ट क्लायबिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पहिल्यांदा भारताचे प्रतिनिधित्व केलं. २०१९ पासून अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलो.

२०२० साली ऑलिम्पिकमध्ये प्रथमच क्लायबिंग या खेळाचा समावेश झाला. तिथुन ऋतिकने ऑलिम्पिक'च्या दृष्टीने तयारी सुरू केली. २०२४ मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी जगभरात विविध ठिकाणी स्पर्धा घेतल्या जातात त्यामध्ये ऋतिक सहभागी होणार आहे. त्यासाठी तो देश-परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षणही घेत आहे.

परदेशात प्रशिक्षण घेण्याचा खर्च आवाक्याबाहेर असल्याने दानशूर व्यक्तींचे सहकार्य घेऊन प्रशिक्षणासाठी जावे लागत असल्याचे त्याच्या आई-वडिलांकडून सांगण्यात येते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य उपलब्ध झाले तर परदेशात जाण्याची गरज नाही. तसेच, आपल्या देशातच आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील, अशी अपेक्षा त्याचे प्रशिक्षक अमोल जोगदंड यांनी व्यक्त केली.

खेळाडूंना चांगल्या दर्जाचे साहित्य मिळणं गरजेचं आहे. नवीन खेळ असल्याने दानशूर व्यक्तींनी पुढे येत जास्तीत जास्त मदत करायला हवी. हा साहसी खेळ असून तो स्पर्धात्मक पातळीवर खेळला जातो. खेळाला लोकाश्रय आणि राजाश्रय मिळाला तर खेळाची प्रगती होईल.

- श्रीकृष्ण कडूसकर, सचिव, इंडियन माउंटेनिरिंग फाउंडेशन, पश्चिम विभाग

ज्या संस्थेला संबंधित क्लायबिंग वॉल चालवण्याचे टेंडर मिळेल, त्यांनीच साहित्य विकत घेऊन वापरायचं आहे. सार्वजनिक ठिकाणी क्लायबिंग वॉल असल्याने महाग साहित्य त्या ठिकाणी बसवणे सुरक्षित नाही.

- डॉ. चेतना केरूरे, महापालिका उपायुक्त क्रीडा

महाराष्ट्र शासनाच्या वतीने खेळाडूंना देण्यात येणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार क्लायबिंग खेळ प्रकारात प्रथमच मला मिळाल्याने खूप आनंद आहे. पुरस्काराचे संपूर्ण श्रेय आई-वडील आणि प्रशिक्षकांना जाते, ज्यांनी मला आत्तापर्यंत वेळोवेळी मार्गदर्शन केले.

- ऋतिक मारणे, खेळाडू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT