पुणे

शिवाजीनगर ते फुरसुंगी इलेव्हेटेड  मेट्रो

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शिवाजीनगर न्यायालय ते फुरसुंगी येथील सुलभ गार्डनदरम्यानचा सुमारे १६ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्गाचा अहवाल दिल्ली मेट्रोने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) नुकताच सादर केला आहे. हा संपूर्ण मेट्रो मार्ग इलेव्हेटेड आहे.

लोकसंख्येचा विचार
पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. दरम्यान, शिवाजीनगरपासून ही मेट्रो हडपसरला नेण्याची मागणी होत होती. तसेच प्राधिकरणानेही शहरभर मेट्रोचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. हडपसर भागातही लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे येथून अनेक नागरिक नोकरीनिमित्त शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच हिंजवडीपर्यंत प्रवास करतात. त्यामुळे हिंजवडी-शिवाजीनगर-हडपसर-फुरसुंगीपर्यंत असा मेट्रो मार्ग करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हडपसरपर्यंत मेट्रो नेणार असल्याचे मध्यंतरी जाहीर केले. त्यामुळे हिंजवडी ते फुरसुंगीपर्यंत मेट्रोच्या मार्गावर शिक्कामोर्तब झाले. 

सर्वेक्षण पूर्ण
शिवाजीनगर न्यायालयात ते फुरसुंगीदरम्यानच्या मेट्रो मार्गाचे सर्वेक्षणाचे काम पीएमआरडीएने दिल्ली मेट्रोला दिले होते. दिल्ली मेट्रोने या मार्गाचे सर्वेक्षण करून नुकताच या संदर्भातील अहवाल प्राधिकरणाकडे दिला आहे. १५.५३ किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे. तो संपूर्ण इलेव्हेटेड असणार आहे. या मार्गावर एकूण पंधरा स्टेशन असणार आहेत. हा मार्ग उभारण्यासाठी अंदाजे साडेचार हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे.

मेट्रोच्या ५७ कार धावणार
हिंजवडी ते शिवाजीनगर असा २३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग आहे. ही मेट्रो शिवाजीनगर येथे महामेट्रोला जोडली जाणार आहे. शिवाजीनगर ते फुरसुंगी असा मेट्रो मार्ग पीएमआरडीएकडून प्रस्तावित केला आहे. संपूर्ण मेट्रो मार्गावरून ५७ मेट्रोच्या कार धावणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 4th ODI: ऋतुराज गायकवाड-रोहित शर्मा सलामीला, इशान पाचव्या स्थानावर; सामना संपताच वेगवान गोलंदाज वन डे टीम सोडून जाणार, नेमकं काय कारण?

Arvind Kejriwal Death Threat: अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने मागितली ७ कोटींची खंडणी

Latest Marathi News Live Update : मुंबई महापालिकेच्या नव्या सभागृह उभारणीच्या प्रस्तावावर आज स्थायी समितीत निर्णय होण्याची शक्यता

IPL Trade Records: हार्दिक पांड्या-अर्शदीप सिंग यांच्या ट्रेडने इतिहास घडवला; आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा ट्रेड ठरला...

मुंबई विमानतळाची आंतरराष्ट्रीय सेवा कायम! ११ कंपन्यांची उड्डाणे नवी मुंबईतून, नवे टर्मिनल उभारणार; प्रशासनाचा मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT