Ajit Pawar sakal
पुणे

Pune Metro : शिवाजीनगर-हिंजवडी-माण मेट्रोच्या कामाचा वेग वाढवा; अजित पवार यांचा आदेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आचार्य आनंदऋषीजी महाराज चौकातील उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेतला. या कामाच्या आढावा बैठकीत बोलताना त्यांनी आदेश दिला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शिवाजीनगर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या मार्गावरील प्रस्तावित मेट्रोसह आचार्य आनंदऋषीजी महाराज चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या कामांना गती द्या आणि सध्या या मार्गावर सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीवर तत्काळ उपाययोजना करा, असा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता.१२) पुणे महापालिका, जिल्हा आणि पोलिस प्रशासनाला दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आचार्य आनंदऋषीजी महाराज चौकातील उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेतला. या कामाच्या आढावा बैठकीत बोलताना त्यांनी हा आदेश दिला.

या आढावा बैठकीला अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त राहुल महिवाल, पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त शेखर सिंह, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि टाटा प्रोजेक्ट्स कंपनीचे अधिकारी आदी उपस्थित होते. पवार यांनी यावेळी या प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा आणि त्यासाठी येत असलेल्या समस्यांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.

पवार पुढे म्हणाले, ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाला गती देण्यासाठी या प्रकल्पासाठी आवश्यक सरकारी आणि खासगी जागांचे संपादन करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय आणि गतीने काम करावे.

नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी महापलिका व पोलिस प्रशासनाने संयुक्त समन्वयातून वाहतुकीचे नियोजन करावे. या प्रकल्पासाठी आवश्यक सरकारी जागा ताब्यात घेण्यासाठी विलंब लावू नये. भविष्यातील ५० वर्षांचा विचार करून या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात यावा.’

जागा ताब्यासाठी १५ सप्टेंबरची मुदत

गणेश खिंड येथील रॅम्प हा ४५ मीटर रुंदीचा करावा. या रॅम्पसाठी आवश्यक ४५ मीटर रुंदीसाठी रस्त्याच्या जागेचा ताबा हा संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून येत्या १५ सप्टेंबरपर्यंत घेण्यात यावा. यासाठी पुणे पालिकेने आवश्यक कार्यवाही करावी. औंध, बाणेर, पाषाण, गणेश खिंड रॅम्प येथील बॅरिकेडिंग (वाहतुकीसाठी मार्ग बंद करणे) करावे आणि आवश्यक तेथे वाहतूक वळविण्यात यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT